Latest News

6/recent/ticker-posts

सामाजिक व शैक्षणिक जनजागृती सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात


लोहा:(सागर तापडिया) तालुक्यातच नव्हे तर जिल्हात एक आदर्श शाळा म्हणून ओळख निर्माण केलेली पारडीची शाळा कला,क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उलेख्खनीय कार्य करत आहे. नावलौकिक असलेल्या या शाळेचा सांस्कृतिक महोत्सव संपन्न झाला. 
यात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचा विकास व्हावा या उद्देशाने गावकरी, शाळा व्यवस्थापन समिती व शाळेचे आदर्श मुख्याध्यापक किसवे सर व त्यांचे सहकारी  शिक्षकबंधु भगिनी या शाळेतील शिक्षक बालाघाटे सर ,सौ टेकाळे मॅडम,सौ गंगाखेडकर मॅडम,सौ इंगोले मॅडम,सौ पांचाळ मॅडम,सौ कदम मॅडम यांच्या अथक परिश्रमाने अतिशय बहारदार तसेच शहरी भागातील इंग्रजी शाळेला लाजवेल अश्या सुनियोजन संपन्न सांस्कृतिक महोत्सव संपन्न झाला.यावेळी विद्यार्थ्यानी गवळण, लावणी, अदिवासी गीत, मिनी ऑर्केस्ट्रा गीत,नाटिका, रोबोट गीत व अन्य धमाकेदार गीतांचे सादरीकरण केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गावचे सरपंच राम पवार होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांंना प्रोत्साहन देण्यासाठी  प्रमुख उपस्थिती लोहा प स सभापती मा.श्री आनंदराव पाटील शिंदे ,उपसभापती मा.श्री नरेंद्र गायकवाड,श्री शरद पाटील पवार लोहा उपनगराध्यक्ष श्री केशवराव चव्हाण,श्री रामभाऊ चणावार,श्री किरण वट्टमवार,श्री भास्कर पाटील पवार,प्रा.डी.एम.पवार सर श्री हरीभाऊ चव्हाण सर,श्री दिनेश सावकार गटशिक्षणाधिकारी श्री रविंद्र सोनट्टके सर ,शिक्षणविस्तार अधिकारी सर्जेराव टेकाळे साहेब,शिक्षणविस्तार अधिकारी सौ आंबलवाड मॅडम सहकारी शिक्षण पतपेढिचे चेअरमन निळकंठराव चोंडे सर,शिक्षण पतपेढिचे उपाध्यक्ष बाबुराव फसमले सर,शिक्षकनेते पी डि पोले सर, शिक्षक परिषदेचे जिल्हाअध्यक्ष दत्तप्रसाद पांडागळे,शिक्षक परिषदेचे जिल्हा संपर्क प्रमुख व्यंकट गंदपवाड, शिक्षक परिषदेचे जिल्हा सहसचिव संगम पडलवार,शिक्षक नेते गजानन उपरवाड,अविनाश अवधुतावार,शेख फारुख,गंगाधर वाघमारे,मुअ श्री बी.वाय चव्हाण,बळी जाधव सर सर,आर.बी.राठोड,सुभाष चव्हाण सर,दता मंगनाळे सर गणेश राजारूपे सर सर,बालाजी फुलपगार,डी.बी.पवार सर, जी.पी.चव्हाण सर,मुख्यमंत्री ग्रामपरीवर्तक सागर तापड़िया,सौ स्वामी मॅडम,सौ सोनट्टके मॅडम,सौ अवधुतवार मॅडम, आदिजण उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments