Latest News

6/recent/ticker-posts

युनिव्हर्सल पब्लिक स्कूल, औरादचा दहावी परीक्षेत शंभर टक्के निकाल

युनिव्हर्सल पब्लिक स्कूल, औरादचा दहावी परीक्षेत शंभर टक्के निकाल


६६ पैकी ६६ विद्यार्थी उत्तीर्ण; ५३ विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य, आकांक्षा गड्डीमे व शोहेब पटेल संयुक्तपणे प्रथम

निलंगा : सीमा एकात्मता शैक्षणिक संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या युनिव्हर्सल पब्लिक स्कूल, औराद येथील विद्यार्थ्यांनी यंदाच्या दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण ६६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. विशेष म्हणजे सर्व ६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यापैकी ५३ विद्यार्थ्यांनी ‘विशेष प्राविण्य’ श्रेणीत यश संपादन केले आहे.

विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये आकांक्षा जनार्दन गड्डीमे व शोहेब महबूब पटेल यांनी प्रत्येकी ९८.८० टक्के गुण मिळवत संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. ऐश्वर्या राजेश कत्ते हिने ९७.६० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर अनुष्का प्रवीणकुमार बियाणी हिने ९६.६० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक संपादन केला. यंदाच्या निकालात तब्बल २८ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करून विद्यालयाच्या यशात मानाचा तुरा खोवला आहे.

विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ. राजकन्या दरक, सचिव सौ. जयश्री कुलकर्णी, मुख्याध्यापक पी. व्ही. कुलकर्णी तसेच पंकज कुलकर्णी, श्रुती कुलकर्णी, उल्हास सूर्यवंशी, अनिता कांभोज, सय्यद मियासाब, आनंद चांडेश्वरी, राजेश माळी आणि सर्व शिक्षकवृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments