Latest News

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र विद्यालय निटुरचा दहावी बोर्ड निकाल उल्लेखनीय; ९५.५८% यश

महाराष्ट्र विद्यालय निटुरचा दहावी बोर्ड निकाल उल्लेखनीय; ९५.५८% यश

निलंगा : महाराष्ट्र विद्यालय, निटुर, ता. निलंगा येथे यशाची उज्वल परंपरा कायम राहिली असून, मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेत विद्यालयाचा एकूण निकाल ९५.५८ टक्के लागला आहे.

विद्यालयातून ९५ टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवणारा मान कु. राजनंदिनी नरसिंग सूर्यवंशी या विद्यार्थिनीने पटकावला असून, तिने केंद्रातूनही प्रथम स्थान प्राप्त केले. शाळेतून द्वितीय क्रमांक कु. गिरी समीक्षा किशोर (९१%) व तृतीय क्रमांक मगर समीक्षा भद्रीनारायण (९०%) यांनी मिळवला. याशिवाय घोरपडे आरती बालाजी (९०%), शिंदे प्रतीक्षा प्रताप (८९%), सगर योगीराज धनराज (८९%) व सूर्यवंशी सोनाक्षी शिवाजी (८७.४०%) या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश मिळवले. तसेच मधाळे प्रज्ञा दिनेश (८७%), जगदाळे वैभव अरुण (८७%) यांनीही शाळेचा लौकिक वाढवला.

एकूण ६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यापैकी ३८ विशेष प्राविण्य, २३ प्रथम श्रेणी व ३ द्वितीय श्रेणीत पास झाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर, अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर, मुख्याध्यापक सुरेंद्र निळकंठराव धुमाळ, शि. पाटील नरसिंग, भोयबारसर, नाईकवाडे सर, चव्हाण, विशाल जाधव, देशमुख अनिल व राजू निटुरे यांनी विशेष कौतुक केले आहे.

Post a Comment

0 Comments