दहावी बोर्ड परीक्षेत मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू हायस्कूलची चमकदार कामगिरी; अनम जावेद पटवेकर अव्वल
एसएससी परीक्षेत 96.85 टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव
लातूर : डॉ. मोहम्मद इकबाल एज्युकेशन सोसायटी, लातूर संचलित मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू हायस्कूल, लातूर यांनी सन 2026 च्या एसएससी दहावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत 96.85 टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेसह यश मिळवत संस्थेच्या शैक्षणिक क्षेत्रातील लौकिकात भर घातली आहे. यंदाच्या परीक्षेत पटवेकर अनम जावेद यांनी 95.40 टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. देशमुख तुबा तोइज़ यांनी 93.20 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तांबोळी अदीबा मो. रफीक यांनी 88.20 टक्के, शेख इकरा रसूल यांनी 86.40 टक्के, पठान आदिना अय्यूब यांनी 85.20 टक्के, तर कादरी बतुल जफर यांनी 85.00 टक्के गुण मिळवून विशेष यश संपादन केले.
तसेच शेख उमेरा इरफान व पठान मारिया अमीन यांनी प्रत्येकी 83.00 टक्के गुण प्राप्त केले. शेख अफशीन सज्जाद यांनी 82.20 टक्के, पठान दानिश अब्दुल्ला यांनी 81.60 टक्के, तर रंगरेज रिजवाना जाकर यांनी 81.40 टक्के गुण मिळवत शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीत स्थान मिळविले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सुलताना काझी, सचिव पठाण अशरफ, मुख्याध्यापिका यास्मीनजहाँ खाजामीयाँ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच शिक्षकवृंदामध्ये कादरी नुसरत शाकेर, कौसर रिना महमद पाशा, शेख सिद्दीखा फराह नजीर अहमद, खतीब सलमा बेगम खलील, पठाण अनिसा मुनिरखान, अखंड मो. अजहरोद्दीन मो. रियाजोद्दीन, शेख नजमा चांदपाशा, सय्यद मेहरुनिसा मुशर्रफ तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे परिश्रम, पालकांचे सहकार्य व विद्यार्थ्यांची जिद्द आणि मेहनत कारणीभूत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. शाळेच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट निकालामुळे परिसरात संस्थेचे कौतुक होत असून, सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



0 Comments