कवठापाटी - तुपडी रस्त्यावर दुचाकी अपघात; दोन युवक ठार
लातूर : निलंगा तालुक्यातील कवठापाटी व तुपडी दरम्यान दुपारी तीन वाजता दोन दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात घडला. यात शिऊर (धनेगाव) येथील २२ वर्षीय सोहेल रहीम शेख व गौर (मसलगा) येथील ३२ वर्षीय अमर सुनील देशमुख हे दोन्ही युवक मृत्युमुखी पडले. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, शिऊर (धनेगाव) येथील अविवाहित सोहेल शेख (वय २२) आपल्या दुचाकी क्र. एम.एच. २४ बाय ९७७८ वर आजोळी तुपडीकडे निघाला होता. त्याच वेळी गौरकडे जाण्यासाठी अमर सुनील देशमुख (वय ३२) दुचाकी क्र. एम.एच. २४ वाय.एल. ८४१० वरून येत होता. कवठापाटी तुपडी दरम्यान खडीकेंद्र जवळ रस्त्याचा अंदाज न लागल्याने दोन्ही दुचाकींचा समोरासमोर धडक झाली. यात सोहेल शेखचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह पानचिंचोली येथील आरोग्यकेंद्रात नेऊन शवविच्छेदन करण्यात आले. दुसरीकडे, अमर देशमुख यांना लातूर येथे नेऊन उपचार दिल्यानंतर बचावाचा प्रयत्न अयशस्वी ठरला व त्यांचा मृत्यू झाला.
तुपडी येथील मक्कामाँ दर्गाहचा उरुस सुरू असल्याने तारीखी बहुतांश तरुण - तरुणी यात्रेकडे जात आहेत. सोहेलची आई - बहीण यात्रेला अगोदरच आल्या होत्या. त्यामुळे सोहेलही यात्रेसाठी निघाला होता. खडकेंद्राजवळ घडलेल्या भयानक घटनेने घरचा एकुलता एक मुलगा गेल्याने शिऊर गाव शोककळा विहीन झाले आहे. अमर देशमुख यांच्यामागे आई - वडील व एक भाऊ असा परिवार आहे. दोन्ही मृत युवक अविवाहित होते. रस्त्याचा अंदाज न लागल्याने समोरासमोर अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची नोंद पानचिंचोली पोलीस चौकीत करण्यात आली आहे.



0 Comments