Latest News

6/recent/ticker-posts

धक्कादायक खून! कन्हेरी चौकाजवळ रिंगरोडवर फरशीने ठेचून निर्घृण खून; पोलीस आरोपींच्या शोधात

धक्कादायक खून! कन्हेरी चौकाजवळ रिंगरोडवर फरशीने ठेचून निर्घृण खून; पोलीस आरोपींच्या शोधात

लातूर : शहरातील कन्हेरी चौकाजवळील रिंगरोडवरील भंगार दुकानासमोर ४५ वर्षीय विठ्ठल सोपान ससाणे उर्फ शहाणेमामांचा सोपासेटच्या लाकडाने व फरशीने ठेचून निर्घृण खून झाला. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. ही घटना मंगळवार-बुधवार, दि. ८ एप्रिलच्या रात्री घडल्याचा अंदाज आहे. घटनास्थळावर सोपासेटच्या  लाकडाने व फरशीने ससाणेंच्या डोक्यावर वार करण्यात आले होते.

मयत विठ्ठल ससाणे (४५, रा. मुगाव, ता. निलंगा) हे भंगार गोळा करून दुकानात विकत व गुजराण करत होते. ते दुकानासमोरच झोपत. पत्नी हयात नसून, तीन मुले परगावी उपजीविकेसाठी राहतात, अशी माहिती मुगावचे माजी सरपंच सुरेंद्र धुमाळ यांनी दिली. 

घटनास्थळी पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी पाहणी केली. उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंह साळवे यांनी तपासाला गती दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकाने आरोपींच्या मागेवर पथके रवाना केली आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्याप्त झाली असून, कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व नागरिकांतील दहशत दूर करण्यासाठी आरोपींना कठोर शिक्षा झाल्यासच समाधान, असे मत व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments