निलंगा:(प्रतिनिधी) कॉम्पुटर अकॅडमी,निलंगाच्या १० व्या वर्धापन दिना निमित्त आयोजित "निलंगा टॅलेंट सर्च स्पर्धा" चे बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बाबुराव ढाले तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र महाविद्यालय निलंगाचे उपप्राचार्य पी.पी.गायकवाड, क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा.मोघे सर उपस्थित होते. लक्ष करिअर अकॅडमी तथा कॉम्प्युटर अकॅडमीचे संचालक राम राठोड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.यावेळी "निलंगा टॅलेंट सर्च" स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना व गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषक सन्मानचिन्ह मानपत्र देण्यात आले. मुलात निलेश नरवणे तर मुलीत स्नेहा पांचाळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल चाबारगे सर यांनी केले तर आभार ज्योती राठोड यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी,बंटी ढाले,राजु जाधव यांनी परिश्रम घेतले.
0 Comments