मनसे व प्रभुराज प्रतिष्ठाण,लातूर च्या वतीने संरक्षणासाठी मास्क व सँनिटायजर वाटप
लातूर:(प्रतिनिधी) जुनी कापड गल्ली,लातूर प्रभाग क्र.६ परिसरात मनपा सफाई कर्मचारी सफाई करण्यासाठी आले असता त्यांच्या हातात ना ग्लोज,मास्क काही जणांना गणवेश ही नसताना पाहून आरोग्याच्या सुरक्षेसाठी यांना अँड. अजय कलशेट्टी,जितेंद्र ढगे, संतोष महिंद्रकर,पप्पू गवळी,दत्ता भोकरे,अनिल महिंद्रकर,संतोष मेंगशेट्टी यांच्या हस्ते मास्क व सँनिटायजर मदत करण्यात आली.
कोरोना विषाणूपासून बचावासाठी आवश्यक आहे.पण जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याऱ्या लातूर महापालिकेच्या व घंटागाडी काम करणाऱ्या सफाई कामगारांना आरोग्याची काळजी कोण घेणार ? तसेच यांना हँण्डग्लोज,मास्क,गणवेश असे सरंक्षनात्मक साहित्य मिळत नसल्याने सफाई कामगारांचे आरोग्य धोक्यात येत आहे. या बाबत मनपा आजून ही गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येते.हे कर्मचारी पहाटे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत सर्व लातुरातील परिसर स्वच्छ करतात आपल्या आरोग्याची कसलेही काळजी न घेता हे जनतेच्या सेवेत राहतात त्यांची काळजी घेणे हे महत्वाचे असते त्या सामाजिक बांधीलकी समजून प्रभुराज प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना त्यांच्या आरोग्य सरंक्षणसाठी मास्क व सँनीटाईजर वाटप करण्यात आले. या सहकार्याबाबत कर्मचारी यांनी कौतुक करत आभार मानले.
0 Comments