Latest News

6/recent/ticker-posts

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या  इमारतीचे बांधकाम अधिक गतीने व दर्जेदार करावे -वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख           

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या  इमारतीचे बांधकाम अधिक गतीने व दर्जेदार करावे
       -वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख 



मुंबई:(प्रतिनिधी) चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे इमारत बांधकाम गतीने आणि दर्जेदार करण्याबाबत तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील यंत्रसामुग्री, औषधपुरवठा आणि त्यासाठी लागणाऱ्या निधीविषयी आरोग्य विभाग,एचएससीसी, वैद्यकीय शिक्षण विभाग, हाफकीन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांची विधानभवनात संयुक्त बैठक आयोजित करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी वैद्यकीय शिक्षण सचिवांना दिले.विधानभवनात चंद्रपूरचे पालकमंत्री तथा बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली व वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाबाबत आढावा बैठक झाली.या बैठकीला आमदार किशोर जोरगेवार, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ.संजय मुखर्जी, तंत्रशिक्षण संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि परिचर्या संवर्गातील रिक्त पदांच्या भरती प्रकियेला शासनाने मान्यता दिली असून याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश चंद्रपूरचे पालकमंत्री तथा बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.


Post a Comment

0 Comments