Latest News

6/recent/ticker-posts

विशेष--> पत्रकार जीवन असे नाव... परिस्थिती मला शिकवते आहे- अरुणकुमार मेहत्रे

विशेष--> पत्रकार जीवन असे नाव... परिस्थिती मला शिकवते आहे- अरुणकुमार मेहत्रे


आई-वडिलांच्या संस्कारातून गाव खेड्यात लहानाचं मोठं झालो जिवनातील एक यशस्वी मार्गाने मार्गक्रमण करण्यास सुरुवातही केली. लहानाचं मोठ होईपर्यंत वडिलांच्या शिकवणीतून यशाचा शिखरही गाठला. जन्म न देता जिवापाड प्रेम करणारी आजीही अात्मसात केली. जवळून आईचे प्रेमही पाहिले. धाडसाने खांद्याला खांदा लावून सदैव माझ्या सोबत उभे राहणारे माझे झुंझार दोन बंधूराजे यांची साथही मिळाली. प्रेमळ बायको बरोबर आईच्या रुपात मिळालेली माझी मुलगी, शांताई आणि माझं बालपण ज्यात पाहातोय तो माझा मुलगा, निशांत. आयुष्यात मार्गदर्शकाप्रमाणे मित्रही मिळाले. यांच्या सहवासात जिवनाचा अप्रतिम उचांक साधला. समाजात माण सन्माण मिळणारी लोकमत मधील पत्रकार नौकरीही माझ्यासाठी सर्वस्व बनली. आज सर्व काही आहे माझ्याजवळ. पण सुखी जीवनास कुठे धक्का लागून आयुष्याच्या काचेवर ओरखडे उठले जातील, त्याचबोरोबर काचेला तडा जाईल. आणि एका क्षणात माझं इवलसं कुटूंब बिखरलं जाईल याची भिती मनोमन वाटत असते. या कोरोना व्हायरसच्या बातमी कव्हर करताना स्वत:ला खुप सुरक्षीत ठेवण्याचा प्रयत्न करतोय. सकाळी घराबाहेर पडताना मनात काहूर माजतो. माझी चिमुकली मला सोडण्यासाठी दारापर्यंत येतात.जड हातानेच बायबाय करुन, त्यांच्या मिळालेल्या ऊर्जाने आज कोरोनाच्या लढाईत मी सक्षमपणे धावतो आहे. दिवसभरात थकलो भागलो तर एकदा तरी वडिलांना फोनवर बोलून नवी ऊर्जा प्राप्त करतो. काळजी घे म्हंटल्यावर मन भरुन येतं. तू चांगले काम करतोस तुला काहीच कमी पडणार नाही. असे शब्द कानावर पडतात. आणि मी योग्य चालतो आहे असे क्षणभर वाटून जाते. वडीलांनी दिलेली उभारी मला नेहमीच उंचीवर नेहून ठेवली आहे. इतरांना वाटेल की मी बापाचं फारच कौतूक करतोय. पण मीच माझा बाप अख्खा पुस्तकासारखा वाचलाय तो इतरांना नाही समजणार .....
असो .... 
मोठ्या संख्येने कोरोनाची लागण पुणे -मुंबईत पहायला मिळत आहे. या ठिकाणी प्रचंड गर्दीचे रस्ते ओस पडलेत, मला घरी जायला साधारण पूर्वी अर्धा तास लागायचा आता तो दहा मिनिटावर आला आहे. पण ते दहा मिनिटेच जीवघेणा वाटतोय .... रस्त्यावरची निरव शांतता कुठे मिट्ट काळोख जीवनावर उठल्यागत वाटतात .... रोज वेगवेगळ्या समस्या डोळ्याला दिसताहेत ... हातावर पोट असलेले जवळपास शंभर पेक्षा जास्त फिरस्ते आज लपून छपून खायला काहीतरी मिळतय का ते शोधताना दररोज भेटतात .....काम नसल्यामुळे पैसे नाहीत त्यामुळे काही विकत घेऊन खाताही येत नाहीय .... यांना झोपायला छप्पर नाहीय, कधी खायला मिळतय तर कधी पाणी पिऊन जागा मिळेल तिथे उपाशी झोपायला लागतय ... समस्या संपत नाहीयेत ... अशी आयुष्यात जगणेच विसरुन गेलेली माणसे पहायला मिळतात. त्यामुळे आपलं दुख: कवडी मोल आहे असं वाटतं....परत घरी जाताना नैराश्य दाटून येतं ... आजूबाजूला काहीच घडत नाहीय अस वाटतय ... काय होतय काही कळत नाहीय ... आपण घाबरलोय का , घाबरवलय याचा शोध कसा लागेल ? करोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी परत जात आहेत ...येणा-या काळात सगळेच जातील ... शहरातील रस्ते परत गर्दीने गजबजू लागतील ... प्रत्येकाच्या जिवनास एक नवीन पालवी फुटेल.... हे सगळ संपेल,नक्की संपेल, आपण सगळे मिळून हे संपवू ... आपल्या शरीरातील अंतरीक जगण्याची शक्ती या कोरोना पेक्षा फार मोठी आहे..... ती या करोनाचा नक्की नाश करेल ... फक्त यासाठी घरात स्वत:ला बंधिस्त करुन घ्यावं लागेल ... बस्स .....


- अरुणकुमार बालाजीराव मेहत्रे,नवी मुंबई


Post a Comment

0 Comments