Latest News

6/recent/ticker-posts

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लातुरात तरुणांचे रक्तदान गोरगरिबांसाठी लातूर शहरात अन्नदान उपक्रम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लातुरात तरुणांचे रक्तदान गोरगरिबांसाठी लातूर शहरात अन्नदान उपक्रम


लातूर:(प्रतिनिधी) कोरोना या महाभयंकर आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत लातुरात सोमवारी युवकांनी स्वच्छेने रक्तदान केले. शिवाय, लातुरात गोरगरिबांना अन्न पुरवठा व्हावा यासाठी ही तरुण मंडळी अन्नदान करीत आहे. माणुसकी जिवंत राहावी यासाठी हा उपक्रम सुरू आहे.
कोरोना या आजाराने महाराष्ट्र राज्यात थैमान घातले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत लातूर येथील वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छेने रक्तदान केले. प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अमोल स्वामी आणि शीतल मगर यांनी वाढदिवस रक्तदान करून साजरा केला. शिवाय,अन्य तरुणांनाही रक्तदान केले. या उपक्रमाच्या माध्यमातून रक्तदान काळाची गरज हा संदेश देत गर्दी न करता स्वच्छेने ब्लड बँकेत जाऊन रक्तदान करावे असे आवाहन प्रतिष्ठानने लातूरकराना केले आहे. यावेळी भालचंद्र ब्लड बँकेतील कर्मचारी सुरेखा हजारे, अंकुश कासले, बालाजी वेदपाठक, वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा, जिल्हाध्यक्ष उमाकांत मुंडलीक, कार्याध्यक्ष अमोल स्वामी, सदस्य अभिजीत स्वामी, शीतल मगर, प्रशांत स्वामी आदींची उपस्थिती होती.
लातुरात अन्नदान उपक्रम
कोरोना या आजारामुळे सर्वत्र बंद आहे. अशात अनेकांना हाताला काम नसल्याने त्यांची पोटाची खळगी भरावी कशी हा प्रश्न आहे. अशात वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने लातुरात अन्नदान करण्यात येत आहे.


Post a Comment

0 Comments