Latest News

6/recent/ticker-posts

निलंग्यात शिवभोजन थाळीचे उद्घाटन

निलंग्यात शिवभोजन थाळीचे उद्घाटन


निलंगा:(प्रतिनिधी) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोणताही गरीब व गरजू नागरीक अन्ना वाचून उपाशी राहू नये  म्हणून तालुका स्तरावर पाच रुपयात शिवभोजन थाळीची सुरुवात करण्याच्या सुचनेवरुन निलंगा येथे तात्काळ अमलबजावणी करत शिवभोजन थाळीची सुरूवात करण्यात आली. काॅग्रेसचे युवानेते अभय साळुंके व तहसीलदार गणेश जाधव यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीमुळे संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्यात २३ मार्च पासून संपूर्ण लाॅकडाऊन करण्यात आले. या दरम्यान ज्यांचे हातावर पोट आहेत त्याचबरोबर रस्त्याने फिरणारे कुटुंब नसलेले नागरीक यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे निदर्शनास आल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तात्काळ तालुका स्तरावर पाच रुपयात शिवभोजन थाळीची सुरुवात करण्याच्या सूचना केल्या. त्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ अमलबजावणी करत तालुका स्तरावर कमीटी नेमुण बुधवार (दि.१) पासून निलंगा शहरातील औराद रोडवर आयसीसी बॅंकेसमोर श्रीजा टिफीन सर्व्हिसेस या ठिकाणी शिवभोजन केंद्राची सुरुवात करण्यात आली. याठिकाणी दररोज सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पाच रुपयात दररोज १५० शिवभोजन थाळी मिळणार आहेत. त्याचे अधिकृत उद्घाटन काॅग्रेसचे युवानेते अभय साळुंके व तहसीलदार गणेश जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, काॅग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष सुधाकर पाटील, माधव पाटील, मारुती गायकवाड, अस्लम झारेकर अदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments