पालकमंत्री अमित देशमुख उद्या लातुरात;कोविड१९, लॉकडाऊन संदर्भात आढावा बैठक
लातूर:( प्रतिनिधी ) राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख १३ फेब्रुवारी रोजी लातूरात येत असून सकाळी ११ वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन करोना/कोविड-१९ संदर्भाने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेणार आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनची अंमलबजावणी तसेच त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना व सद्यस्थिती याचा सविस्तर आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे.
या बैठकीस जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता व इतर संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
0 Comments