अनंत तुळजाराम नाईक विद्यालयाची SSC बोर्ड परीक्षेत यश
नळेगाव:(प्रतिनिधी) येथील अनंत तुळजाराम नाईक विद्यालायाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यशाची उत्तुंग परंपरा कायम राखत विद्यालयात गुणवंत विद्यार्थी तयार करण्याची परंपरा कायम ठेवली विद्यालयाचा एकूण निकाल ९९.१ टक्के लागला. एकूण परीक्षेस प्रविष्ट झालेले विद्यार्थी १०२ एवढे होते त्यापैकी १०१ विद्यार्थी उत्तीर्ण झालेली आहेत. कु. निसाले कामाक्षी राजेंद्र ९८.४० टक्के गुण घेऊन विद्यालयातून प्रथम आली. तर बिराजदार श्रद्धा अंकुश व शिरुरे आदित्य प्रमोद हे ९८.२०% गुण घेऊन द्वितीय आले. विद्यालयातील एकूण २३ विद्यार्थ्यांनी ९०% च्या पुढे गुण मिळवले
त्यात बिराजदार वैष्णवी सुनिल ९७.४०%
माने मयुरी देविदास ९७.००% पाटील प्रतिक्षा दिलीपराव ९६.२०%
अश्विनी चंद्रकांत हुडगे ९६.२०%
दांडगे शिवम चंद्रशेखर ९५.४०% आणि भोसले आदित्य दत्तात्रय ९५.२५%
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे सचिव डॉ. माणिकरावजी पाटील संस्थेचे अध्यक्ष माधवराव त्र्यंबकराव पाटील संचालक सूर्यकांत रेड्डी, शिवनगे दादा, जीवनराव बिराजदार, अमर पाटील, अभिजीत पाटील, डॉ. प्रशांत शिरुरे, उमाकांत देवशटवार, कैलास रेड्डी, बाळकृष्ण प्रयाग सर्व सन्माननीय सदस्य यांनी अभिनंदन केले. तर विद्यार्थ्यांच्या यशासाठी अथक परिश्रम घेणारे विद्यालयाचे मु. अ. बालाजी येरोळे, जीवन रेड्डी, संजय सगर व इतर सर्व मान्यवर सहशिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
0 Comments