Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा तहसील कार्यालयासमोर मनसेचे धरणे 

निलंगा तहसील कार्यालयासमोर मनसेचे धरणे 



नुकसानग्रस्त पिकांचा ताबडतोब पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी


निलंगा:तालुक्यातील अनेक गावामध्ये सोयाबीन पीकावरती नांगर फिरवण्याची वेळ आली आहे कारण अनेक ठिकाणी सोयाबीन माजले आहे. परंतु वांझोटे ठरुन त्याला अतिषय कमी शेंगाची लागण झाली आहे त्यातच सोयाबीन वर किड्यांचा संसर्ग होऊन करप्या रोगाची लागण झाली आहे.त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय म्हणून शासनाने ताबडतोब अशा सोयाबीन चे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाध्यक्ष डॉ.नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर धरणे देत तहसीलदारांकडे केली. तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक हे सोयाबीन आहे परंतु बोगस बियाणे बाजारात आल्यामुळे शेतकऱ्यावर दुबार-तिबार पेरणीचे संकट आले.सुदैवाने पाऊसकाळ चांगला झाल्यामुळे सोयाबीन चांगले आले असे वाटत असताना ते सोयाबिन माजले व त्याला न च्या बरोबर शेंगाची लागण झाली.त्यातच करप्या,कीड लागून सोयाबीन ची पाने अनेक ठिकाणी गळून गेली व सोयाबीन वाळले सुद्धा सोयाबीन च्या उत्पन्नावरच शेतकऱ्याचे वार्षिक आर्थिक व्यवहार चालतात आणि नेमके तेच पीक गेल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.त्यातच मूग,उडीद ही सुद्धा खरिपाची पिके या वर्षी शेतकऱ्याच्या हाताला लागली नाहीत व त्याचे मोठे नुकसान झाले.बोगस बियाणे बाजारात आणलेल्या शासनाने किमान आता तरी अशा शेतकऱ्यांचे पंचनामे ताबडतोब करावे या साठी मनसे कार्यकर्त्यांनी निलंगा तहसील समोर तीव्र धरणे धरले व तिथेच तहसीलदारांना बोलवून सोयाबीन ची पेंडी भेट दिली.शासनाने विमा कंपन्यांकडून व स्वतः मदत जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ आधार देणे गरजेचे आहे व हे नाही झाले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेल असा इशारा डॉ.नरसिंह भिकाणे यांनी दिला.या आंदोलनात तालुकाअध्यक्ष सूरज पटेल,शहरअध्यक्ष प्रदीप शेळके,नजीर मुजावर,यश भिकाणे,अरबाज पठाण,जीवन धोत्रे,नारायण कोकरे,सुदर्शन काळे,पावन काळे,विनोद जेकाकुरे,शाफिक शेख आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments