धनेगांव ग्रामस्थाच्या वतीने कै.डाॕ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांना भावपुर्ण श्रद्धांजली
देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) अहमदपूर मठाचे शिवाचार्य,राष्ट्रसंत डाॕ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे आज दुःखध निधन झाले,लिंगायत समाजाची न भरुन निघणारी हानी झालीआहे,शतायुषी ठरलेल्या अहमदपुरकर महाराजांनी लिंगायत समाजात खुप जागृती केली.मन्मथ स्वामी महाराजांच्या दिंडीचे काम आयुष्यभर केले.मन्मथ स्वामी मराठवाड्यासह इतर राज्यात प्रसिध्द केले. त्यांनी अनेक ग्रंथाची निर्मिती केली.अनेक गीत,आभंग लोकांना माहित केले.अनेक राजकीय नेत्यापासून ,सामाजिक कार्यकर्ते ,धार्मिक व्यक्तीला योग्य मार्गदर्शन करणारे लिंगायत संस्कृतीचे आधार स्तंभच गेला. परमेश्वर महाराजांच्या आत्म्यास शांती देवो, म्हणुन बस्वेश्वर चौक धनेगांव येथे दिवसभर भजनाचा कार्यक्रम करण्यात आला व .धनेगांव ग्रामस्थाच्या वतीने कै.डाॕ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांना भावपुर्ण श्रद्धांजली. अर्पण करण्यात आली यावेळी सोमनाथ बिरादार,अंनतराव बिरादार,बाळासाहेब डगवाले, विश्वनाथ बिरादार , गुरुनाथ पाटील, संजय पाटील, गुंडेराव शेटकार, जंयत पाटील , अनंत पाटील, संतोष बिरादार, नागेश बिरादार, संतोष पालापुरे , विश्वनाथ बिरादार , बाळासाहेब शेरे, शिवरुद्र बिरादार, राहुल पाटील, संतोष बिरादार, संजय बिरादार, गंणपत चरपले ,सौ महादेवी बिरादार,सौ प्रभावती पुट्टे, सौ भागीरथी शेटकार ,सौ पुण्यावती बिरादार,सौ विजयाबाई पाटील ,सौ शकुंतला पाटील, सौ उषाबाई शेटकार,आदीसह नागरीक व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
0 Comments