अन्यथा उपविभागीय अधिकारी कार्यालयासोर बेमुद्दत धरणे आंदोलन करणार- मुजीब सौदागर
निलंगा:( शहर प्रतिनिधी/इरफान शेख) शहरातील विविध मागण्यांसाठी निलंगा येथील उपविभागीय अधिकारी यांना सामाजिक कार्यकर्ते मुजीब सौदागर यांच्या नेत्रत्वात निवेदन देऊन मागण्या व रखडलेल्या सुविधा त्वरित सुरू करण्यात याव्या अन्यथा २८ सप्टेंबर पासून उपविभागीय कार्यालयासमोर बेमुद्दत धरणे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
निलंगा शहरातील शिवाजी नगर,हैदरिया नगर,औरंगपुरा गल्ली,जामबाग, माळी गल्ली,दत्त नगर,बॅंक कॉलनी रोड, लातूर बिदर रोड,रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात त्वरीत कच टाकण्यात यावी. दादापीर दर्गाजवळील मुख्य रस्त्यावर नाली फुटून, नालीचे घाण पाणी रस्तावर येऊन होत असलेली अस्वच्छता व अडथळा कायमचा दूर करावा व शिवाजी नगर भागातील सार्वजनिक कबरस्थानातील घाण पाणी जाऊन होत असलेली विटंबना त्वरित थांबवावी सर्वसामान्य नागरिकांच्या मागण्यांस,तक्रारीस,निवेदनास केराची टोपली दाखवणाऱ्या कामचुकार मुख्याधिकारी यांची हकालपट्टी करण्यात यावी अशा मागण्या केल्या आहेत निवेदनावर मुजीब सौदागर, फारूक सौदागर, निसार चौधरी, निजाम हाशमी,हिरा कादरी,हनिफ खुरेशी, रसूल मणियार,हुसेन शेख, अभिषेक सुर्यवंशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 Comments