औसा शहर दर रविवारी कडकडीत बंद; व्यापारी संघटनेचा निर्णय
औसा:(तालुका प्रतिनिधी बी.जी.शेख)दि. ५ - कोरोना सारख्या महामारी ची साखळी रोखण्यासाठी औसा शहरातील व्यापारी संघटनेने पुढाकार घेतला आहे.यापुढे या आजाराचा खात्मा होईपर्यंत दर रविवार शहर कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
औसा शहर आणि तालुक्यात करोना रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सर्व शासकीय यंत्रणा याला रोखण्याचा प्रयत्न करीत आहे. तरीही आकडा वाढत चालल्याने आता आपण स्वतः होऊन यासाठी कांही प्रयत्न केले नाही तर प्रत्येक घरात हा विषाणू पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर औसा शहरातील सर्व आस्थापने ज्यात किराणा ,कापड,भुसार,जनरल स्टोअर्स, कृषी सेवा केंद्र,आडत बाजार आदी सर्व आस्थापने दर रविवार पूर्णत: बंद ठेवण्याचे नियोजन केले आहे. कांहीची गैरसोय नक्कीच होणार असली तरी हा निर्णय आणि त्यावर अंमलबजावणी करणेही आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी आणि शहरासाठी अत्यंत आवश्यक असल्याने ही दुकाने बंद राहतील. तरी सर्व ग्राहक व नागरिकांनी याची नोंद घेऊन विनाकारण घराबाहेर पडू नये. असे आवाहन शहरातील सर्व व्यापारी असोसिएशन कडून करण्यात आले आहे.
शहरात स्पीकर च्या माध्यमातून हा संदेश देण्यात आला आहे.
0 Comments