प्रेषित मोहम्मद पैगंबरां विषयी आपत्तीजनक विधान केल्यामुळे जोडे मारून व पुतळा जाळून केला निषेध
लातूर:(जिल्हा प्रतिनिधी बी जी शेख) संपूर्ण देशामध्ये फ्रान्सच्या अध्यक्षा विरोधात निदर्शने चालू आहेत. तसेच निदर्शन औसा शहरांमध्ये केले गेले. फ्रान्सच्या अध्यक्षाच्या पुतळ्यावर सुरुवातीला जोडे मारून व नंतर या पुतळ्याचे दहन करून निदर्शन करण्यात आले. यावेळी शहरातील नामवंत नागरिक उपस्थित होते ज्यामध्ये समाजवादी पार्टीचे बाबा पटेल,अॅड.शाहनवाज पटेल, सामाजिक कार्यकर्ते खुनमीर मुल्ला,आदी उपस्थित होते. एखाद्या देशाच्या जबाबदार व्यक्तीने अशा पद्धतीचे विधान करणे चुकीचे आहे.अशी घटना यापुढे झाल्यास आम्ही सतत विरोध करत राहू. अशा प्रवृत्तीला जगात कोठेही थारा मिळणार नाही .धार्मिक भावना दुखावतील अशा घटना जबाबदार व्यक्तीने करू नये.अशा पद्धतीचे विचार यावेळी अॅड शहानवाज पटेल यांनी व्यक्त केले.
0 Comments