हजरत टीपु सुलताना यांची जयंती रक्तदान करुन साजरी
वहाब जाहागीरदार यांचे १९ वे रक्तदान
चाकुर:{ता.प्र.सलीमभाई तांबोळी} कोरोनांच्या महामारीमुळे आज लातुर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे.टीएस ग्रूप नळेगांव येथील युवकांना हजरत शहीद टीपु सुलतान यांच्या जयंती निमित्त सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन राष्ट्रीय कार्यात आपले योगदान दिले.कोरोनामुळे आज सर्वसामान्य जनता हैराण आहे.कोरोनांची लागन झालेल्या रुग्णांना रक्ताचा पुरवठा सुरळीत व्हावा एकमेव उद्देशांने रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. नळेगाव येथे शाहिद हजरत टिपू_सुल्तान रह. यांच्या जयंती निमित्य दि. 20 नवंबर 2020 वार शुक्रवार रोजी टी एस ग्रूप नळेगाव यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी 19वा रक्तदान करताना मुख्याध्यापक वहाब जागीरदार. या वेळी फित कापून रक्तदान शिबिर चा उदघाटन करण्यात आले माधवराव पाटील ,रामराव बुदरे, अनिल चव्हाण , खुदबोद्दीन घोरवाडे,ताजोद्दीन घोरवाड़े,शमीम कोतवाल,अभिजीत पाटील,राजू शेलार,मुन्ना भाई कुरेशी,मुख्तार मुजावर,वसीम शेख,अमीर कुरेशी,फैसल कोतवाल,खाजा शेख,अज़हर कुरेशी,सोहैल घोरवाड़े, ज़ाहिर गोंड़गावे,तौसीफ इनामदार,टी एस ग्रुपचे वखास कुरेशी,इस्माईल मुजावर,आखेब(गुड्डू)मुजावर,असलम मचकुरी,ईमरान जागीरदार,सोहैल मुजावर,संगमेश्वर ढोले,आदी उपस्थित होते.

0 Comments