तलावाचे खोलीकरण झाले पाहिजे "या मागणीसाठी केळगाव मध्ये ग्रामस्थांच्या धरणे आंदोलनाला सुरुवात
केळगाव:{प्रतिनिधी वसीम मुजावर} एस डी पी एल महामार्ग रोड कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने पाझर तलावामध्ये खोली करुन देण्याची मागणी करित केळगाव येथिल नागरिकांनी धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. जहिराबाद ते लातूर हा राष्ट्रीय महामार्ग निलंगा तालुक्यातून जात आहे त्याचे काम लातूर पासून ते औराद पर्यंत सुरू आहे त्या कामाला लागणारा कच्चामाल दगड मुरूम हे केळगाव येथील शेतकऱ्याकडून पुरवला जात आहे केळगाव येथे महामार्ग बनवणारी कंपनी शिंदे डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी केळगाव येथील शिवारातील खोदकाम करून त्यातून दगड घेऊन जात आहे तरी त्या कंपनीने केळगाव येथील आडूळ शिवारातील सर्वे न 178,183,177,185,ऐकून महाराष्ट्र शासन संपादित जमीन 19 ऐकर 28 गुंठे आहे तरी सदरील पाझर तलावातील दगड महामार्गगाच्या कामासाठी घेऊन जावे त्यामुळे त्या तलावाचे खोलीकरण होईल व केळगाव येथील ग्रामस्थांचा उन्हाळ्यात होणारा पाण्याचा प्रश्न मिटेल. या मागणीसाठी केळगाव मध्ये पाणी फाउंडेशन व समस्त ग्रामस्थांच्या वतीने धरणे आंदोलन आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. त्या धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गावातील विविध पक्षातील संघटनेतील लोक पाठिंबा दर्शवत आहेत. सदरील तलाव खोलीकरण केल्यामुळे परिसरातील तीन किलोमीटरच्या विंधन विहिरीचे पाण्यात वाढ होईल व कायमस्वरूपी केळगाव चा पाणी प्रश्न मिटेल यासाठी या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. जोपर्यंत खोलीकरणाचे काम होणार नाही तोपर्यंत धरणे आंदोलन तुटणार नाही असा ठाम निर्णय आंदोलकांनी केला आहे.

0 Comments