नकळत तो पडला आण अपघात घडला
चौकातील बारवला कठड्याची गरज
बाबुराव आगलावे
भादा : गावच्या मुख्य चौकातील बारवत एक कुत्र्याचं पिल्लु पडुन मृत झाल्याचं लक्षात येताच ग्रामपंचायत सदस्य अमोल पाटील भादेकर व सचिन मुकडे सह इतर तरुणांनी त्यास तात्काळ बाहेर काढले. मात्र गावच्या चौकातील या बारवला कठडा नसल्याने आज मुका प्राणी दगावला उद्या काहीही विपरीत घडु शकते म्हणुन या बारवला आता सुरक्षीत कठड्याची गरज आहे. व येथे तात्काळ कठडा बांधावा अशी मागणी आज तरुणांनी अमोल पाटील भादेकर यांच्याकडे केली.
भाद्याच्या मुख्य चौकात एक पुरातन बारव असुन तिच्यात पाणी आहे. गेल्या काही काळाच्या अगोदर या बारवची स्वच्छता करण्यात आली होती. मात्र या बारवला सुरक्षीत कठडा नसल्याने एखादी दुर्घटना घडु शकते व त्याच्यासाठी सुरक्षिततेची खबरदारी म्हणुन लवकरच कठडा बांधावा अशी मागणी आज तरुणांनी केली. यावेळी सचिन मुकडे, रेश्पाल शिंदे, भिमाशंकर पाटील व अनेक तरुण उपस्थित होते.

0 Comments