Latest News

6/recent/ticker-posts

मद्य विक्री बंद

 मद्य विक्री बंद


लातूर:(जिमाका) दि.17 - कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई मद्य निषेध कायदा 1949 च्या कलम 142 अन्वये जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दि. 19 फेब्रुवारी, 2021 रोजी शिवजयंती उत्सव संपूर्ण लातूर जिल्ह्यात साजरा होत आहे.  

त्यानिमित्ताने जिल्ह्यातील सर्व किरकोळ मद्यविक्री अबकारी अनुज्ञप्ती मद्यविक्रीस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व अनुज्ञप्तीधारकांनी आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. 

या आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकांविरुध्द नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.

Post a Comment

0 Comments