Latest News

6/recent/ticker-posts

सावित्रीच्या लेकी सरोजाताई सूर्यवंशी यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार जाहीर

सावित्रीच्या लेकी सरोजाताई सूर्यवंशी यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार जाहीर 


चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) कोल्हापूर येथील आविष्कार फौंडेशनच्या वतीने सामाजिक शैक्षणिक क्रीडाआरोग्य सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक वर्षी महत्वपूर्ण व प्रतिष्ठेचे समजले जाणारे पुरस्कार महापुरुषांच्या नावे दिले जातात यंदा  2021 चा दिला जाणारा अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा राजमाता जिजाऊ पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या  देवणी  येथील विवेक वर्धिनी विद्यालयाच्या सहशिक्षिका सौ सरोजा ताई रघुनाथ सूर्यवंशी(मोटेराव) यांना 8 मार्च रोजी जाहीर करण्यात आला एका विशेष समारंभात त्यांना हा पुरस्कार अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार असल्याचे निवडपत्राद्वारे कळविण्यात आले. सरोजा सूर्यवंशी यांचा जन्म अगदी सुसक्षित कुटूंबात झाला त्यांचे वडील रघुनाथ सूर्यवंशी सर हे मुख्याध्यापक असल्याने घरात शैक्षणिक वातावरण होते  " शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही "हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श त्यांच्या समोर असावा किंवा शिक्षणाशिवाय मानवाच्या जीवनात परिवर्तन नाही असं रघुनाथ गुरुजींनी कुठंतरी वाचलं असावं  त्यांनी आयुष्यभर नौकरी करून आयुष्याची कमाई आपल्या मुलामुलांच्या शिक्षणासाठी खर्ची घातली आज घरातील सर्वच मुलं बहिणी शासकीय सेवेत आहेत  त्यातील सरोज सूर्यवंशी ह्या उच्च शिक्षित आहेत त्यांनी प्राथमिक माध्यमिक शिक्षण पूर्ण करून  तमाम बहुजन समाजाचे काहीतरी देणे लागते म्हणून शिक्षकी पेशेसाठी लागणार शिक्षण पूर्ण करून वडिलांच्या करंगळी ला धरून शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला आज देवणी येथील विवेकवर्धिनी विद्यालयात एक विध्यार्थी भिमुख आदर्श शिक्षिका म्हणून विध्यादानाचे कार्य करीत आहेत  एक उपक्रमशिल शिक्षिका म्हणून त्यांची आगळी वेगळी ओळख आहे आपल्या विध्यार्थ्यांना प्रमाण मानून विद्यार्थ्यांत कसे परिवर्तन घडवता येईल यासाठी सूर्यवंशी ताई प्रयत्न करीत आहेत सरोजा सूर्यवंशी ह्या स्पष्ठ वक्त्या आहेत भाषण, करणे चित्रकला, कार्यानुभव, खो खो ह्या खेळात त्यांनी महाविद्यालय जीवनात त्यांनी विशेष प्राविण्य मिळविले आहे  त्यांच्या अंगी असलेले सर्व गुणधर्म विध्यार्थी यांच्यात उतरविण्याचा प्रयत्न करीत असतात त्यांचा विवाह चाकूर येथील चंद्रकांत मोटेराव यांच्याशी झाला मोटेराव सर जिल्हा परिषद शिक्षक असले तरी फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील एक पाईक आहेत डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्हाला आमच्या जीवनाचा अर्थ कळाला " रमाई न भिमाला घडवलं  जिजाऊ ने शिवाजी महाराजांना घडवलं तर जोतिबा फुले यांना सावित्रीबाई फुले घडवलं  प्रत्येक पुरुषांच्या यशाच्या माग महिलांचा सहभाग आहेच  असं म्हणतात सरोजा ताईन चंद्रकांत गुरुजींना घडविले असं म्हणता येत नसेल तर त्यांची अर्धांगिनी बनून सासर महेरच्या ना घेऊन चंद्रकांत मोटेराव गुरुजी यांच्या जीवनात चैतन्य निर्माण करून त्यांना प्रेरणा दिली त्या पत्नी बहीण मैत्रीण या सर्वभूमिकेत असणाऱ्या सरोजा सूर्यवंशी यांचा आदर सत्कार होतो त्यांच्या कार्याचे फलित असल्याचे समजतो मी स्वता सुमित गिरीधर गायकवाड व परिवाराच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments