निटुर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्ण कल्याण समितीची बैठक संपन्न
लातूर: निलंगा तालुक्यातील निटुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आज रुग्ण कल्याण समितीची बैठक संपन्न झाली त्यावेळी विविध समस्येवर सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीला संजय गांधी निराधार समितीचे निलंगा सदस्य सुरेंद्र धुमाळ, पत्रकार राजकुमार सोनी लक्ष्मण मगर, आरोग्य रुग्ण कल्याण समितीचे सदस्य यांना संपूर्ण आढावा सांगण्यात आला. राजाभाऊ सोनी व सुरेंद्र धुमाळ यांचे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर मोरे यांनी काळ व आपली जबाबदारी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

0 Comments