अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या हातातील माल आणि जनावरांच्या तोंडचा चारा पळविला

लातूर:(जिल्हा प्रतिनिधी-बी डी उबाळे) आवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या हातातील शेतीमाल आणि पशूंधनाच्या तोंडाचा घास पळविला आहे. औसा तालुक्यामध्ये मंगळवार दि. 22 मार्च रोजी रात्री आणि बुधवार दि. 23 मार्च 2021 रोजी पहाटे झालेल्या पाऊस अवकाळी पावसाने औसा तालुक्यात शेतकऱ्याची मोठी धावपळ केली कारण अचानक सुरू झालेले वादळ आणि पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणात हातातोंडाशी आलेले रब्बी रब्बी पीक भुईसपाट झाले आणि त्यावर मातीचे अवरण आल्याने पशु साठी असणारा चारा आणि मानवासाठी असणारे अन्न यामध्ये रब्बी ज्वारी आणि हरभरा,गहू या पिकामध्ये मातीचे मिश्रण झाले आहे त्यामुळे निसर्गाने मानवी आणि प्राणी या दोन्ही खाद्यामध्ये अचानक पणे अवकाळी पावसाने माती मिसळण्याचे दिसून येत आहे या पर्जन्यवृष्टीबाबत भादा सजाचे तलाठी तलाठी यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी भादा सर्कलमध्ये 20 मी मी पाऊस झाल्याची नोंद भादा सज्जाचे तलाठी दुधभाते यांच्याकडे नोंद असल्याचे समजते. या झालेल्या पावसामुळे औसा तालुक्यातील अनेक गावात पीक काढणी आणि शेतमाल संरक्षण, साठवणूक, मळणी करणे सुरू होते परंतु अचानक आलेल्या अवकाळी पावसाने सर्व परिस्थिती बदलून टाकली आणि शेतीमाल भिजला आहे यामुळे विक्रीसाठी किंवा दैनंदिन खाण्यासाठी या मालाची प्रतवारी नक्कीच घसरली असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
0 Comments