Latest News

6/recent/ticker-posts

तांबरवाडी,राजेवाडी ग्रामपंचातच्या वतिने नागरीकांना कोरोना बचावासाठी भोंग्याद्वारे जनजागृती

तांबरवाडी,राजेवाडी ग्रामपंचातच्या वतिने नागरीकांना कोरोना बचावासाठी भोंग्याद्वारे जनजागृती


लामजना:(प्रतिनीधी/जीवण जाधव) सामाजिक बांधिलकी जपत संचारबंदीचे नियम पाळा- सध्या कोरोना विषाणुच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी आणि लॉकडाऊन सुरू केला आहे. या अनुषंगाने शासन आणि प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांसाठी नियमावली बनवली असुन आवश्यक त्या सुचना केलेल्या आहेत. या सुचनांचे तंतोतंत पालन करावे. जेणेकरुन प्रत्येक नागरिकांचे, त्यांच्या कुटुंबीयाचे आणि पर्यायाने समाजाचे हीत होईल. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढीची साखळी तुटेल. असे भावनिक आवाहन तांबरवाडी राजेवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच विशाल बीराजदार यांनी केले आहे. सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असुन दिवसेंदिवस रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे आणि मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन जनतेच्या हिताचा विचार करुन केवळ नाईलाज म्हणून संचारबंदी आणि निर्बंध लादले गेले आहेत. आपल्या परीसरात कायम लॉकडाऊन लागु होऊ नये यासाठी प्रत्येक नागरिकांने अत्यंत सजगपणे परिस्थितीचे गांभीर्य ओळखुन वागावे. जेणेकरुन स्वतःच्या व समाजाच्या आरोग्याचे रक्षण होईल. प्रशासनालाही कठोर पावले उचलण्याची वेळ येणार नाही. प्रत्येक नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. मास्क चा वापर नियमित करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, शारीरिक अंतर ठेवुन वागावे, नियमित हात धुवावे असेही आवाहन ही विशाल बीराजदार यांनी  यांनी केले. होम कोरंटाईन झालेल्या लोकांनी 14 ते 17 दिवस सामान्य लोकांच्या संपर्कात येऊ नये. वास्तविक पाहता सात आठ दिवसात त्या लोकांना आराम वाटु लागला तर ते पॉझिटिव्ह पेशंट लगेच बाहेर फिरु लागले आहेत अशी चर्चा आहे. हे अत्यंत चुकीचे असुन कोरोनाचा पॉझिटिव्ह पेशंट 12 ते 14 दिवस सामान्य निरोगी व्यक्तीस संसर्ग पसरवु शकतो.याचे गांभीर्य लक्षात घ्यावे, मी आता बरा आहे. मला काहीच ञास नाही. मला कोणतीच लक्षणे नाहीत. मला दमा लागत नाही असे कारणे सांगुन पाच सात दिवसांतच घराबाहेर पडुन स्प्रेडरची भुमिका बजाऊ नये. शासनाच्या सुचनांचे पालन करुन होम कोरंटाईन झालेल्या लोकांनी शासनाच्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे व आपल्या परीसरातील नागरीकांना विनंती आहे आपनाला कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी घरीच थांबायच आहे घरी रहा सूरक्षीत रहा वारंवार हात धूवा सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्या. असा सल्ला ग्रामपंचायतचे सरपंच सौ. बालीका भोकरे, ऊपसरपंच विशाल बीराजदार व ग्रामसेवक हाके यांच्या मार्फत गावभर भोंग्याद्वारे जनजागृती करण्यात आली.

Post a Comment

0 Comments