सुश्रुत हॉस्पिटच्या कोविड सेंटरचे आ. निलंगेकर यांच्या हस्ते लोकार्पण
डॉ.अहंकारी यांच्या हॉस्पिटलच्या वतीने उभारण्यात आलेल्या 30 खाटांच्या कोविंड सेंटरचे आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते लोकार्पण
केळगाव:( प्रतिनिधी/वसीम मुजावर ) तालुक्यातील प्रसिद्ध एमडी मेडिसिन डॉ. श्रीधर अहंकारी यांच्या सुश्रुत हॉस्पिटलच्या वतीने उभारण्यात आलेल्या तीस खाटांच्या कोविंड सेंटरचे लोकार्पण माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते शुक्रवारी रिबीन कापून लोकार्पण करण्यात आले. यावेळी आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे डॉ. अहंकारी यांनी स्वागत केले आमदार निलंगेकर हॉस्पिटलची संपूर्ण पाहणी करून डॉ. अहंकारी यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. आरोग्य यंत्रणेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे अक्का फाउंडेशनच्या वतीने नेहमी सहकार्य केले जाईल संकट काळात आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत असला तरी त्यांनी प्रत्येकाचा जीव वाचवणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट आहे या दृष्टिकोनातून काम करावे असे आवाहन करून आरोग्य यंत्रणेच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभी असून त्यांना आवश्यक असणारे सर्व मदत देण्यात येईल असा विश्वास आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला तसेच आक्का फाउंडेशन कडून नेहमी सहकार्य केली जाईल असे आमदार यांनी सांगितले.

0 Comments