दशमेश हॉस्पिटल मध्ये कोरोना लस उपलब्ध
नांदेड: दि. 20 मे सुप्रसिद्ध धार्मिक संस्था गुरुद्वारा तखत सचखंड बोर्ड द्वारे संचालित श्री दशमेश हॉस्पीटल दवाखान्यात जिल्हा प्रशासनाच्यावतीने व आरोग्य यंत्रणेच्या वतीने गुरुवार, दि. 20-05-2021 रोजी कोरोना प्रतिबंधक लस कोवैक्सीनच्या शंभर डोजचा पुरवठा करण्यात आला. मागील 20 दिवसांपासून (दि. 29-04-2021) येथे वैक्सीनचा पुरवठा थांबवण्यात आला होता. विशेषता दूसरी लस घेणाऱ्यामध्ये चिंता पसरली होती. दशमेश हॉस्पिटल केंद्र हा शहराच्या मध्यभागी असून सर्वधर्मीय नागरिकांना त्याचा लाभ मिळत होता. त्यानंतर नागरिकांची होत असलेली गैरसोय पाहता पत्रकार रवींद्रसिंघ मोदी यांनी श्री दशमेश हॉस्पिटल येथे त्वरित कोरोना लसीकरण सुरु करण्यची मागणी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली होती. जिल्हा प्रशासन, महानगर पालिका प्रशासन, जिल्हा आरोग्य यंत्रणा यांनी मागणीला स्फूर्त प्रतिसाद देत गुरुवारी श्री दशमेश हॉस्पीटल मध्ये शंभर डोज उपलब्ध करून दिले. डोज उपलब्ध झाल्यावर डोज घेण्यासाठी नागरिकांनी केन्द्रावर रांगा लावले. मागणीची गम्भीरतेने दखल घेतल्यामुळे वरील जिल्हा आरोग्य अधिकारी सह सर्व यंत्रणांचा व जिल्हा प्रशासनाचे पत्रकार रवींद्रसिंह मोदी आणि अन्य नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे. तसेच श्री दशमेश हॉस्पीटल येथे लसीकरण कार्यक्रम योग्यरित्या अमलात ठेवावा अशी आशा बाळगली जात आहे.

0 Comments