Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा येथील नायब तहसीलदार अरुण महापुरे यांचा ग्रामीण शेतकऱ्यांशी दबावतंत्राचा वापर

निलंगा येथील नायब तहसीलदार अरुण महापुरे यांचा ग्रामीण शेतकऱ्यांशी दबावतंत्राचा वापर


मदनसुरी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील अनुसूचित जमातीतील शेतकरी दत्तात्रय लक्ष्मण विठुबोने हे त्यांच्या शेतीच्या वैयक्तिक कामानिमित्त किंवा गावातील गोरगरीब लोकांच्या सामाजिक सेवेच्या भावनेतून रेशन कार्ड काढणे, गोरगरीब लोकांची कामे करीत असतात, त्यामुळे त्यांचे निलंगा येथे जाणे येणे असते. अशाच एका कारणास्तव दत्तात्रय लक्ष्मण विठुबोने निलंगा येथिल तहसील कार्यालयात फ़िरत असताना नायब तहसीलदार अरुण महापुरे यांनी त्यांना बोलावून तू दररोज निलंगा येथे का येतोस? तुझ्यावर कारवाई करेन ? असा सज्जड दम महापुरे यांनी दिल्यामुळे मला तहसील कार्यालयात फिरण्यास बंदी का ? याबाबत दहा दिवसांत मला लेखी स्वरूपात  न्याय देण्यात यावे अन्यथा मी संबंधित  वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे न्याय मागणार असल्याचे  निलंगा येथील उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments