निलंगा शहरातील विविध मागण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर 1 जुलै ला धडकणार आक्रोश मोर्चा
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा येथील स्थानिक पातळीवरील विविध मागण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढणार असल्याचे उपविभागीय अधिकारी यांना एका शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे त्यात खालील आठ मागण्या केल्या आहेत.
1) शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्यात मुरुम किवा कच घालुन खड्डे बुजवण्यात यावे , 2)अतिक्रमण काढतांना गोरगरिबांचे केलेले नुकसानाची भरपाई त्वरीत करण्यात यावी . 3) मुख्यधिकारी यांचा नियोजन शुन्य आहे अनेक ठिकाणी नळाच्या पाण्याची व्यवस्था न करताच बोअरचे स्टाटर काढुन पाण्यासाठी नाहक त्रास दिला , जनतेच्या तक्रारीना व निवेदनाला केराची टोपली दाखवणा - या मुख्यधिका - याची त्वरित बदली करण्यात यावी 4) प्रधानमंत्री आवास योजनेतील राहिलेले हप्ते त्वरित देण्यात यावे 5) संपूर्ण शहरातील नाल्याची स्वच्छता , करण्यात यावी , दादापीर रोडवरील घान पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटवण्यात यावा 6) औरंगपुरा येथील नाल्यावर पुल बांधण्यात यावे , शहरातील विविध भागात नविन वस्त्यात ज्याठिकाणी रस्ते नाहीत तेथे पर्यायीव्यवस्था म्हणुन मुरुम व कच टाकण्यात यावे 7) माळेगल्ली व पिरपाशा दर्गा ते पेठ रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असुन सदरील : कामे डबल करेपर्यंत संबंधित गुत्तेदाराचे बिल पास करण्यात येवू नये , व चौकशी करुन दोशीनवर कार्यवाही करण्यात यावी 8) शहरातील अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावरील पथदिवे बंद आहे ते त्वरित चालु करण्यात यावे . वरील मागण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालावर शहरातील सर्व त्रस्त निलंगेकरातर्फे दिनांक 01/07/2021 वार गुरुवारी रोजी आक्रेाष मोर्चा काढण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे सदरील मोर्चा समस्त त्रस्त निलंगेकरांतर्फे काढण्यात येणार असल्याचे समजते सदरील निवेदनावर मुजीब सौदागर, गोविंद सुर्यवंशी, शारुख सय्यद,सोमनाथ कदम,जाकीर शेख,नईम खतीब,शरद गायकवाड, सब्दर कादरी,बालाजी गायकवाड,मुस्तफा शेख,आमिर सय्यद,जमीर शेख,अंगद सुर्यवंशी, बालाजी सुरवसे,महेश ढगे,इस्माईल खुरेशी, सोहेल शेख,रब्बानीं सौदागर,नवाज मणियार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

0 Comments