Latest News

6/recent/ticker-posts

जनावरांच्या गोठयांची योजना तात्काळ अंमलात आणा

जनावरांच्या गोठयांची योजना तात्काळ अंमलात आणा 


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख ) निलंगा तालुक्यातील वीज पडून बरेच जनावरे दगावली आहेत आणि तालुक्यामध्ये जीवित हानी होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे अवकाळी पाऊस गारा वीज पडणे यामुळे शेतकरी या अडचणीत सापडला आहे म्हणून शासनाची रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जनावरांचा गोठा बांधण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी निलंगा तालुक्यामध्ये तात्काळ करण्यात यावी या विषयीचे निवेदन गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांना देण्यात आले यावेळी निलंगा तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग फिरोज जागीरदार व काँग्रेसचे कार्यकर्ते गोविंद सूर्यवंशी , नशीब तांबोळी यांनी या विषयाच्या निवेदन गटविकास अधिकारी निलंगा यांना देण्यात आले.

Post a Comment

0 Comments