पदोन्नती आरक्षण रद्द करणारा शासन निर्णय रद्द करा आरपीआयचे मुख्यमंत्र्यांना तहसीलदार मार्फत निवेदन
देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) दिनाक- 2 जून 2021 रोजी रिपब्लिकन_पार्टी_ऑफ_इंडिया ता.देवणी,जिल्हा .लातूर च्या वतीने ना.डॉ.रामदास आठवले यांच्या आदेशानुसार, मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्यात आल्याच्या विरोधात महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध करत आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हा अध्यक्ष देवीदास कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष अंकुशभाऊ ढेरे, आय.टी.सेल जिल्हा उपाध्यक्ष गणेशभाऊ कांबळे दवणहिप्परगेकर, देवणी ता.अध्यक्ष विलास वाघमारे, ता.उपाध्यक्ष धनराज गायकवाड, शहर अध्यक्ष विक्रम गायकवाड, शिरूर अनंतपाळ ता.अध्यक्ष मधुकर कांबळे, निलंगा ता.अध्यक्ष संदीप कांबळे, रोहीत डोंगरे, विठ्ठल गायकवाड, महेश काळे, अमित ढेरे आदि सह कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments