गावपातळीवरील जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी शिवसेना सर्वोतोपरी मदत करणार- जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने
औराद, हलगरा, बोरसुरी येथे शिवसंपर्क अभियानाला उत्सफुर्त प्रतीसाद
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) लातुर जिल्ह्यातील प्रत्येक शासन स्तरावरील गावातील जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी व शासन योजना मिळवुन देण्यासाठी शिवसेना सर्वोतोपरी मदत करणार व लोकांना शिवसेनेच्या दिलेल्या वचनपुर्तीचा मान राखन्याचे काम जिल्ह्यातील शिवसेना करणार असल्याचे आजच्या औराद येथील शिवसंपर्क अभियानाच्या बैठकीत जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य लिंबन महाराज रेशमे हे बोलत होते या शिवसंपर्क अभियानात जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने, जिल्हा नियोजन समिती सदस्य लिंबन महाराज रेशमे, जिल्हा महिला संघटक शोभाताई बेंजरगे, तालुका प्रमुख अविनाश रेशमे व युवासेना जिल्हाप्रमुख अँड. राहुल मातोळकर, उपजिल्हाप्रमुख आण्णासाहेब मिरगाळे व तालुकाप्रमुख प्रशांत वांजरवाडे याची उपस्थिती होती. शिवसेनाप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने शिवसंपर्क अभियान राबवून सर्व शिवसैनिकांनी शासकीय योजनेचा लाभ गोरगरीब जनतेपर्यंत पर्यंत पुरविण्यासाठी व अडीअडचणी मध्ये मदत करण्यासाठी एकत्रित राहून संपर्कात राहून मदत करण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी संपर्कात राहावे यासाठीच शिवसंपर्क अभियानाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात राबवावे व त्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या परिसरातील शाखाप्रमुख सहित जिल्हा प्रमुख प्रमुख पर्यंत सर्वांनी एकत्रित येऊन व संपर्कात राहून पक्षवाढ करण्याचे आदेश आल्यानुसार आज औराद शहाजानी येथे शिवसंपर्क अभियानाची बैठक आयोजित केलेली होती. येथील बैठकीला औरादसह जनतेने व पदाधिकाऱ्यांनी उत्सफुर्तपणे प्रतीसाद दिला व गावातील विकास कामांच्या अडीअडचणी बोलुन दाखविल्या व या आम्हाला वेळोवेळी वरीष्ठ पदाधिकाऱ्यांनी लागणारी मदत व विकासकामांसाठी पाठपुरावे करणे गरजेचं असल्याचे या बैठकीत नागरीकांनी बोलुन दाखविले. यावर आजच्या बैठकीसाठी आलेले लातुर जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, जिल्हा नियोजन समिती सदस्य लिंबन महाराज रेशमे व उपजिल्हा प्रमुख व संगायो समिती सदस्य विनोदजी आर्य, तालुका प्रमुख अविनाशजी रेशमे यांनी यांनी गावपातळीवरील निराधार लोकांना मदत, गाव विकास कामांसाठी लागणारी तालुका, जिल्हा पातळीवरील सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले व तसे प्रस्ताव प्रत्येक शिवसेना व युवासेना पदाधिकारी यांनी संबंधित सर्व कार्यालयात पाठविण्यासाठी पुढाकार घ्यावे व अडीअडचणी आल्या तर आम्हाला संपर्क करा आम्ही तात्काळ मदत करुन ते कामे पुर्ण करुन घेण्यासाठी तत्पर मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी औरादसह शेळगी येथुन अजय माकणे व पदाधिकारी यांची उपस्थिती होती तर हलगरा येथेही उत्सफुर्त प्रतीसाद देत मनोज तांभाळे व इतर पदाधिकारी यांनी शेकडोंच्या संख्येने कार्यक्रमाचे आयोजन केले तर औराद येथील बैठकीला अमोल ढोरसिंगे, लखन बोंडगे, श्रीरंग गाडे, बाजार समितीचे संचालक बस्वराज वलांडे, नितीन वलांडे, शरद भंडारे, शिवाजी शेटगार, आगरे, लातुरे, कन्हैया पाटील, अंकुश भंडारे व पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments