Latest News

6/recent/ticker-posts

मुसळधार पावसानंतर निटूर मंडळात शेतकऱ्याच्या दुबार पेरणीला सुरुवात

मुसळधार पावसानंतर निटूर मंडळात शेतकऱ्याच्या दुबार पेरणीला सुरुवात


निलंगा:( प्रतिनिधी/रमेश लांबोटे ) तालुक्यात औराद शहाजानी सह निटूर मंडळांमध्ये सर्वाधिक पाऊस होऊन अनेक एकरावरील पिके पाण्याखाली वाहून शेतीचे बांध व तुटून गेले आहेत त्यामध्ये खरिपामध्ये पेरण्यात आले सोयाबीन, उडीद, तूर, मका, ज्वारी हे पीक पाण्यासोबत वाहून गेले आहे. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांती नंतर आज शुक्रवारी निटूर मंडळातील परिसरामध्ये शेतकरी हे दुबार पेरणी ला सुरुवात केल्याचे दिसून आले. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांचा नेहमी शेतकऱ्याला सामना करावा लागत आहे. अगोदरच पैशाची जुळवा-जुळव करून खरिपाची पेरणी केली होती त्यामध्ये मुसळधार पाऊस परत आर्थिक संकट त्यात कर्जबाजारी होऊन शेतकरी पुन्हा मशागतीला लागून पेरणीची सुरुवात करत आहे यामुळे निटूर व मंडळातील शेतकरी चांगलेच आर्थिक संकटात सापडले आहेत व अनेक दुबार शेतकरी पेरणी करत आहेत.

Post a Comment

0 Comments