Latest News

6/recent/ticker-posts

अमृत मोहत्सवानिमित्त वसंतराव पाटलांच्या कार्याला दिला उजाळा

अमृत मोहत्सवानिमित्त वसंतराव पाटलांच्या कार्याला दिला उजाळा


मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस उत्साहात साजरा

द्रोणाचार्य कोळी

निलंगा
: तालुक्यातील ग्रामीण भागात शिक्षणाचे जाळे निर्माण करून सर्वसामान्य उपेक्षित वर्गाला शिक्षण उपलब्ध करणारे शिक्षण तज्ञ तथा मुख्याद्यापक संघनेचे राज्याध्यक्ष वसंतराव पाटील यांचा अमृत मोहत्सवी वाढदिवस मोठ्या उत्साहाने बुधवारी दि. 11 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. या अमृत मोहत्सवानिमित्त त्यांनी केलेल्या शिक्षण क्षेत्रातील कार्याला यानिमित्ताने उजाळा देण्यात आला. शिवणी कोतल ता. निलंगा या छोट्याशा गावामध्ये शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वसंतराव पाटील यानी प्रतिकुल परस्थितीत शिक्षण घेऊन अनेक मोठ्या नौकरीच्या संधी असताना देखील गावातील शाळेत शिक्षक म्हणून आपल्या सेवेची सुरवात केली. त्याच काळात अनेक गोरगरीब होतकरू मुलांना शिक्षणा सोबतच अर्थिक सहकार्य करून अनेक विध्यार्थांना शासकीय सेवेतील उच्च पदापर्यंत पोहचवले सहशिक्षक म्हणून काम करीत असतानाच त्यांच्या कार्याची व गुणवत्तेची चुणूक बघून विध्यार्थी प्रिय शिक्षक अशी वेगळी छाप निर्माण केल्याने त्यांना मुख्याद्यापक म्हणून पदोन्नती देण्यात आली. त्याच काळात संस्थेची जबाबदारी देण्यात आली. त्याच काळात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांत आपला मोठा मित्र परिवार तयार केला. विध्यार्थी दशेत चळवळीत काम करत असताना भाजपाचे थोर नेते कै. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे शिक्षण महर्षी प्राचार्य ना. य. डोळे, गोविंदभाई श्राॕफ, माजी केंद्रियमंत्री कै. विलासराव देशमुख यांच्याशी स्नेहाचे संबंध होते. त्यांच्यामुळेच वसंतराव पाटील यांना वेगवेगळ्या शासकीय पदावर काम करण्याची संधी मिळाली. शिवाय ग्रामीण भागात शिक्षणाचे जाळे निर्माण करून उपेक्षित व सर्वसामान्य विध्यार्थांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. बुधवारी ता. 11 रोजी त्याचा अमृत मोहत्सवी 75 वा वाढदिवस निलंगा येथील जयभारत विद्यालयात शिक्षण क्षेत्रातील नागरिक, संस्थेचे कर्मचारी वर्ग व त्याच्या मित्र परिवाराकडून साजरा करण्यात आला. यावेळी कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, काँग्रेसचे नेते अभय सोळूंके, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अजित माने, दिलीप धुमाळ, पत्रकार संघ, मराठा सेवा संघ, गटशिक्षणाधिकारी संतोष स्वामी, शिक्षक, मुख्याद्यापक, आधिकारी व विविध क्षेत्रातील आधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना शुभेच्छा व सत्कार करून अभिस्टचिंतन केले. यावेळी जयभारत विद्यालयाच्या प्राध्यापक व शिक्षक वर्गाकडून पेढे तोलाई करण्यात आली. शिवाय शाळेतील विध्यार्थांनी ढोल व झांज पथकाने मोठ्या उत्साहाने स्वागत केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुकेशनी पवार यांनी तर आभार उपप्राचार्य सुधाकर बिरादार यांनी मानले. वसंतराव पाटील यांचे प्राथमिक शिक्षण व सेवा गावातच झाल्याने शिवणी-कोतल येथे सकाळी गावकर्यानी त्यांचे गावात स्वागत करून जंगी सत्कार केला. महाराष्ट्रभर त्यांना माननारा मोठा वर्ग असला तरी त्यांनी आपल्या जन्मभुमीला कधीही विसर पडू दिला नाही. सतत त्यांचा संपर्क गावात असतो त्यामुळे त्यानी आपले गाव व गावातील नागरिकासोबत प्रेम व वात्सल्याचे संबंध असल्याने त्यांनी आपली नाळ तुटू दिली नाही.

Post a Comment

0 Comments