समाजातील शेवटच्या घटकातील लोकाना मांजरा अर्बन निधी मुख्य प्रवाहात आणेल- माजी खा.डॉ.सुनील गायकवाड
लातूर:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) लातूर शहरात मांजरा अर्बन निधी बँके चे उद्घाटन लातूरचे लोकप्रिय माजी खासदार डॉ.सुनील बळीराम गायकवाड यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. उद्घाटन प्रसंगी डॉ.सुनील गायकवाड बोलत होते की समाजातील शेवटच्या घटकातील माणसांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही निधी बँक निश्चितच महत्वाची भूमिका बजावणार आहे.त्याचा फायदा महिला आणि छोटे छोटे नवीन उद्योजक यांना होणार आहे. कार्यक्रमाला लातूर मनपाचे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, भाजपा महिला आघाडी जिल्हाअध्यक्ष मीनाताई भोसले ,नगर सेवेक प्रवीण अंबुलगेकर,नगरसेवक देवाभाऊ साळुंके, नगरसेवक रागिणी यादव,नगरसेवक विशाल जाधव आदी जण उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक प्रियांका सुरवसे, सूत्रसंचालन योग गुरू अमर वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

0 Comments