Latest News

6/recent/ticker-posts

अशोकराव पाटील निलंगेकर यांनी पुर नुकसान ग्रस्त भागाची भरपावसात भिजत केली पाहणी

अशोकराव पाटील निलंगेकर यांनी पुर नुकसान ग्रस्त भागाची भरपावसात भिजत केली पाहणी



निलंगा:(प्रतिनिधी/रमेश लांबोटे) ढोबळेवाडी, उजेड, बाकली, बसपुर, राणीअंकुलगा या मांजरा नदी काठावरील गावात दोन दिवसापासुन होत असलेल्या पावसामुळे व मांजरा धरणाचे पाणी नदीमध्ये सोडल्यामुळे नदीकाठावरील सर्व शेतकरी बांधवांचे सोयाबीन, तुर, उसाचे अतोनात प्रचंड नुकसान झाले यांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकरी बळीराजाच्या व्यथा, अडचणी जाऊन घेऊन सर्वच मांजरा नदीकाठावरील घुग्गी सांगवी, फर्करानपुर, गौर, वांजरखेडा, मुगाव, शेंद, हालकी, डोंगरगाव, निटुर, शिरोळ वांजरवाडा, गिरकसाळ, वळसांगवी, शिऊर, धनेगाव, नदीवाडी, हालसी, या निलंगा, शिरुर अनंतपाळ, देवणी या तिन्ही तालुक्यातील नदीकाठच्या गावातील तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे नुकसान भरपाई साठी विनाअट शिफारस करावी असे ऊपजिल्हाधिकारी सौ. शोभा जाधव यांना नुकसान पिडीत श्रेत्रातुन त्वरीत आदेश देण्यात आले व पुरनुकसानग्रस्त भागातील तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी यांना पंचनामे करण्याच्या सुचना देण्यात आल्या. यावेळी लक्ष्मणराव बोधले ( सभापती,कृषी ऊत्तपन्न बाजार समिती, शिरुर अनंतपाळ ), आबासाहेब पाटील ऊजेडकर ( तालुकाअध्यक्ष, काँंग्रेस कमिटी, शिरुर अनंतपाळ ), प्रकाशदादा पाटील बाकलीकर ( ज्येष्ठ काँंग्रेस नेते ), सिराज देशमुख ( माजी न.प.सभापती, निलंगा ),तानाजीराव निडवंचे ( माजी ऊपसभापती, पं.स.शिरुर अनंतपाळ ) सुरेंद्र धुमाळ ( सं.गो.यो. सदस्य, निलंगा ), वैशंपायन जागले ( सं.गो.यो. सदस्य, शिरुर अनंतपाळ ), दिलीप हुलसुरे ( माजी सभापती, पं.स.निलंगा ), गंगाधर चव्हाण ( सदस्य,कृ.ऊ.बा.स.औराद शहाजनी तथा चेअरमन, सोसायटी, बसपुर ), रामभाऊ गायकवाड ( माजी सभापती  जि.प. समाजकल्याण ), भरत शिंदे (काँंग्रेस युवा नेते तथा सरपंच, कळमगाव ),अनंत जाधव ( तालुका काँंग्रेस युवा नेते, शिरुर अनंतपाळ ), संजय बिराजदार ( जिल्हाअध्यक्ष, किसान काँंग्रेस ), रमेश मोगरगे ( काँंग्रेस युवा नेते, निलंगा ), अँंड सुतेज माने-पाटील ( युवा काँंग्रेस नेते ), ऊमाकांत शिंदे ( तालुकाअध्यक्ष,काँंग्रेस सेवा दल, शिरुर अनंतपाळ ), सुधीर लखनगावे ( काँंग्रेस युवा नेते तथा तालुकाअध्यक्ष काँंग्रेस सोशल मिडीया, शिरुर अनंतपाळ ), अमर आवाळे ( काँंग्रेस युवा नेते ),गणेश गुराळे, यशराज दुरुगकर सह काँंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, शेतकरी बांधव यावेळी ऊपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments