Latest News

6/recent/ticker-posts

भाजपाच्या जिल्हा चिटणीसपदी नितीन रेड्डी

भाजपाच्या जिल्हा चिटणीसपदी नितीन रेड्डी


चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) चाकुर नगरपंचायतीचे  उपनगराध्यक्ष नितीन रेड्डी यांची भाजपाच्या जिल्हा चिटणीस पदी जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांनी नियुक्ती केली आहे. भारतीय जतना पार्टीच्या बैठकीत उपनगराध्यक्ष नितीन रेड्डी यांची जिल्हाचिटणीस पदी निवड करून जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी मराठवाडा विभाग संघटनमंत्री संजय कौडगे,माजी समाजकल्याण सभापती संजयजी दोरवे, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर, माजी नगराध्यक्ष किरण उटगे,जिल्हा चिटणीस राजकुमार राजारूपे,माजी जी.प.सदस्य तुकाराम मद्दे,माजी सभापती व्यंकटराव सोनवणे,जिल्हासरचिटणीस त्र्यंबक गुट्टे,माजी जी.प.सदस्य ऋषिकेश बद्दे आदी उपस्थित होते. नितीन रेड्डी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सामाजिक कार्यास सुरूवात केली आहे.संघाचे तृतीय शिक्षा वर्ग पूर्ण केलेले आहे.चाकुर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष म्हणुन काम करीत असताना अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. नगरसेवक, गटनेता, उपनगराध्यक्ष पद भुषविले आहे. उपनगराध्यक्ष कार्यकाळात चाकुरात अनेक विकास कामे केलेली आहेत.पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन जिल्हा चिटणीस पदी काम करण्याची संधी दिली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments