Latest News

6/recent/ticker-posts

स्वतःच्या आरोग्याची स्वतःकाळजी घेणे आवश्यक- ओम राजेनिंबाळकर

स्वतःच्या आरोग्याची स्वतःकाळजी घेणे आवश्यक- ओम राजेनिंबाळकर



मोफत आरोग्य तपासणी : १०७ एस. टी. कर्मचाऱ्यांची तपासणी

के वाय पटवेकर

उस्मानाबाद: आपण खूप वेगाने चालणार्‍या जगात कार्यशील वेळापत्रक आणि जीवनशैलीसह जगतो. यामुळे शरीरात तणाव-संबंधित अनेक रोग होऊ शकतात. ताणतणाव आणि चिंता वाढणे हे विविध प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक विकारांशी विशेषतः जोडलेले असून स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष्य न करता स्वतः काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केले. उस्मानाबाद येथील बसस्थानकात क्रीडा भारती आणि शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते, व्यासपीठावर नगराध्यक्ष मकरंद  राजेनिंबाळकर, उस्मानाबाद विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डीन डॉ नागनाथजी गंगासागरे, विभागीय वाहतूक अधिकारी अश्वजीत जानराव, विभागीय वाहतूक अधीक्षक हर्षद बनसोडे, उस्मानाबाद आगर प्रमुख पांडुरंग पाटील, स्थानक प्रमुख राम शिंदे, क्रीडा भारती जिल्हाध्यक्षा लक्ष्मी स्वामी, जिल्हामंत्री प्रविण गडदे, जिल्हा युवक प्रमुख कुलदीप सावंत, डॉ. धनश्री लीके, डॉ. मयूर देशमुख आदींची प्रमुख उपस्तीथी होती. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील १०७ कर्मचाऱ्यांनी शिबिरात सहभागी होत तपासणी करून घेतली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयातील डॉक्टर, क्रीडा भारती पदाधिकारी व राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रताप इंगळे यांनी तर आभार राम माने यांनी मानले.

Post a Comment

0 Comments