Latest News

6/recent/ticker-posts

कासार सिरसी येथील कन्या शाळेसह परिसरातील तीन स्मार्ट शाळा विद्यार्थ्यांच्या प्रतिक्षेत

कासार सिरसी येथील कन्या शाळेसह परिसरातील तीन स्मार्ट शाळा विद्यार्थ्यांच्या प्रतिक्षेत


मदनसुरी:{ प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी }निलंगा तालुक्यातील कासार सिरसी सह परिसरातील जिल्हा परिषदेच्या तीन शाळा स्मार्ट शाळा म्हणून घोषित झाल्या असून बाला उपक्रमांतर्गत या सर्व शाळांच्या इमारती शैक्षणिक साधनांच्या आभूषणाने नटले असून आता या सर्व शाळा विद्यार्थ्यांसाठी आसुसलेल्या आहेत कोरोना संसर्ग आजाराच्या पार्श्वभूमीवर तब्बल दीड वर्षापासून या भागातील सर्व शाळा अद्याप बंद असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व मुलांना ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षण दिले जात असल्याची माहिती केंद्रप्रमुख एल एम बोटले यांनी दिली. लातूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय अभिनय गोयल यांच्या संकल्पनेनुसार सबंध जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या बाला उपक्रम या अभिनव उपक्रमांतर्गत कासार सिरसी येथील कन्या शाळेच्या इमारतीचा उपयोग शैक्षणिक साधन म्हणून करण्यात आला असून या अंतर्गत शाळा परिसरात स्वच्छता वृक्षारोपण परसबाग नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र क्रीडा साहित्य यासह कासार सिरशी चे हे ज्ञानमंदिर सर्व साधनसामुग्रीने नटले असून लवकरच इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग चालू होणार असल्याचे संकेत मुख्याध्यापक डी. जी. बिराजदार यांनी दिले स्मार्ट शाळा म्हणून घोषित झालेल्या या चार शाळेचे श्रेय  कोराळी हत्तरगा व हलसी या गावचे शाळा व्यवस्थापन समिती सह शिक्षकांना देण्यात येत आहे कासार सिरसी येथील कन्या शाळेच्या शालेय समितीचे अध्यक्ष किशोर मिलगीरे यांचेसह सहशिक्षक एस के पांचाळ, संजू होळकुदे , रेवाडकर मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे सांगण्यात आले या केंद्रांतर्गत 13 प्राथमिक व सहा माध्यमिक शाळांचा समावेश असून उर्वरित सर्व शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर भर देण्यात येणार असून या सर्व शाळा चे स्मार्ट शाळेत रूपांतरित करण्याचा संकल्प येथील आढावा बैठकीत घेण्यात आला.

Post a Comment

0 Comments