Latest News

6/recent/ticker-posts

रासपच्या लातूर युवा जिल्हाध्यपदी बोडके यांची निवड

रासपच्या लातूर युवा जिल्हाध्यपदी बोडके यांची निवड 


कर्तबगारीने काम केल्याची पक्षाकडून पोचपावती 


जिल्हाभरातून बोडके यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव 

देवणी:( प्रतिनिधी/विक्रम गायकवाड ) राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हा कार्यकारणी  निवडीचा कार्यक्रम उदगीर येथील एमआयडीसी परिसरात बुधवारी पार पडला.  यावेळी रासपचे उदगीर तालुका अध्यक्ष पदाची धुरा सांभाळणारे नागनाथ बो़डके यांची लातूर जिल्हा युवा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्यातून बोडके यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तर चांगल्या कामाची पोच  पावती पक्षाने दिली असल्याचे मत बोडके यांनी व्यक्त केले आहे. उदगीर मतदार संघातील कर्तबगार नेते म्हणून राजकारणात आपला ठसा उमटवणारे नागनाथ बोडके यांची रासप लातूर युवा जिल्हाध्यपदी बुधवारी निवड करण्यात आली आहे. रासपचे संस्थापक व माजी मंत्री महादेव जानकर यांचे बोडके विश्वासू मानले जातात. तर लातूर जिल्ह्यातील  धनगर समाजाशी नाळ जोडलेला नेता अशी ओळख आहे. समाजासाठी चोविस तास तत्पर राहणारे बोडके यांनी उदगीर तालूक्यात समाज माध्यमातून अनेक कामे केली आहेत. कोरोना काळात अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवला. तर लातूर जिल्ह्यात, पाणी प्रश्न नेहमीच भेडसावत असतो. त्यासाठी तहानलेल्या गावासाठी टॅंकरद्वारे  पाणी देण्याचे काम केले आहे. सर्वसामान्यांसाठी त्यांची कायम धडपड सुरु असते. अनेकांची शासकिय अडलेली कामे तसेच दिनदुबळ्यांसाठी आधार देण्याचे काम सातत्याने बोडके करतात. उदगीर तालुक्यातील खड्ड्यात जाणाऱ्या  रस्त्यासाठी आंदोलने  केली. रस्त्यावरील खड्डे फूलांनी भरुन प्रशासनाच्या विरोधात निषेध व्यक्त केला. उदगीर तालूक्यातील उभरते नेतृत्वाची झलक उदगीर नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधकांना चांगलाच घाम फोडला होता. समाज हिताचे काम करत असताना उदगीर पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली. तर उदगीर परिसरात वृक्षारोपन, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीरे आदी कार्यक्रम गेल्या अनेक दिवसात घेण्यात  आले.  बुधवारी उदगीर येथे रासप जिल्हा  कार्यकारणी निवड  कार्यक्रमास राष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्य सचिव बाळासाहेब दोडतले, जिल्हाध्यक्ष प्रा. विष्णू गोरे, जेष्ठ नेते गोवींद नरवटे, लातूर जिल्हा संपर्क प्रमुख रामराव रोडे रासपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments