तरुणांनी बौद्ध चळवळ व्यापक करावी- आयु राजरत्न आंबेडकर
लातूर: बौद्धांचे आधारस्तंभ असणारे राजरत्न आंबेडकर यांचा लातूर दौरा यशस्वी झाल्यानेच बौद्धांच्यामध्ये नवचैतन्य संचारलेचे दिसून येत आहे. दि:-११ सप्टेंबर २०२१ वार शनिवार रोजी मा. राजरत्न आंबेडकर साहेबांचे लातुर नगरी मध्ये जंगी स्वागत करण्यात आले सर्वप्रथम शुद्धोदन गार्डन बौद्ध विहार येथे शुद्घोदन ट्रस्ट तर्फ स्वागत करण्यात आले. सायकांळी ६:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बहुसंख्य प्रमाणात जन समुदाय व भारतीय बौद्ध महासभेचे सर्व शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते. राजरत्न आंबेडकर यांचे आगमन होताच. त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.७:०० वाजता लुम्बुनी बौद्ध विहार येथे जिल्हा निवड कार्य कारणी बैठकीत सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीने, विविध संघटनेच्या नेते व पदाधिकारी यांच्या वतीने तसेच भारतीय बौद्ध महासभेची जिल्हा कार्यकारणी, तालुका कार्यकारणी यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. तथागत भगवान बुद्ध व बोधीसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूजन मा राजरत्न यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वांनी त्रिशरण पंचशील गृहण केले. जिल्हा निवड कार्यकारणी बैठकीचे अध्यक्ष मा. राजरत्न आंबेडकर हे होते. या बैठकीस दिनेश हणमंते, वैभव धबडगे, प्रा किशोर चक्रे, कुमारभाऊ सोनकांबळे जिल्हा प्रभारी, नगरसेवक सचिन मस्के, विकास कांबळे हे उपस्थित होते सर्वांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक कुमारभाऊ सोनकांबळे यांनी केले मा. राजरत्न आंबेडकर यांनी मार्गदर्शन केल. सर्व मतभेद विसरून सर्वांनी धम्म रथात अरुढ व्हावे. धम्माचे महत्व, धम्मा मुळे होणारी प्रगती, हारे, तुरे देण्यापेक्षा धम्म चळवळीस सर्वे तोपरी योगदान देण्यास आवाहन केले. तरुणांना भारतीय बौद्ध महासभेत काम करण्याच आव्हान केले. दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा ही मात्त सत्ताक संस्था एकच असुन जनतेने संभ्रम करून घेवू नये असे ही सांगितले. सर्व राजकिय पक्षात काम करणारे लोक हिंदूत्वाच्या मुद्दयासाठी एकत्र येतात. त्याप्रमाणे आपण ही एकत्र येवून बौद्ध चळवळी साठी एकत्र येण्याचे आवाहन केले. यावेळी नूतन जिल्हा कार्यकारणी जाहिर केली आयु. कुमारभाऊ सोनकांबळे- अध्यक्ष, आयु. महादेव वाघमारे- उपाध्यक्ष, आयु. विशाल गायकवाड- उपाध्यक्ष, आयु रविकांत सिरसाट- मुख्य सचिव, आयु विजय मस्के- सचिव, आयु.भगवान इसाळे- सचिव, आयु. सतिश मस्के- कोषाध्यक्ष, आयु राजीव कांबळे- मुख्य संघटक, आयु अरविंद दामावले- संघटक, आयु सुरेंद्र कांबळे- संस्कार प्रमुख, आयु निवृत्ती सुर्यवंशी- पर्यटन प्रमुख, आयु . बालाजी उबाळे- संस्कार प्रमुख, उपस्थित सर्वांनी अनुमोदन दिले. यावेळी देवणी, औसा, रेणापूर या तीन तालुका कार्य कारणी देखील जाहिर केल्या. या कार्यक्रमात देवणी तालुका अध्यक्ष आयु महेश काळे व सर्व पदाधिकारी, औसा तालुका अध्यक्ष आयु मोतीराम कांबळे व सर्व पदाधिकारी, रेणापूर तालुका अध्यक्ष आयु सिद्धार्थ कांबळे व सर्व पदाधिकारी बहुसंख्येने बौद्ध उपासक-उपासिका उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आयु रविकांत सिरसाट यांनी केले तर आभार सुरेंद्र कांबळे यांनी मानले.

0 Comments