निराधारांची दिवाळी झाली गोड... शिरोळ गावच्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी राबवला अभिनव उपक्रम
शिरोळ: गावातील माजी विद्यार्थी 1991 ची दहावीची बॅच तथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरोळ येथील माजी विद्यार्थी यांनी अनोखा सामाजिक उपक्रम राबवला. "आम्हीही तुमचाच परिवार" असे समजून गावातील गोर गरीब निराधार व्यक्तींची दिवाळी गोड व्हावी यासाठी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन दिवाळी फराळाचे वाटप केले. यासाठी 1991 च्या बॅचचे मुस्तफा सय्यद ,राजकुमार रावजादे ,जलील सय्यद ,तुळशीराम सूर्यवंशी, मच्छिंद्र तेलंगे यांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमास लागणाऱ्या फराळाची व्यवस्था केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रताप पाटील उपसरपंच तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ज्योतीराम गुरदाळे सर आणि माधवराव धडे सर हे होते या मान्यवरांच्या हस्ते फराळाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा यासाठी प्रसाद जाधव, नवाज तांबोळी, अरविंद कदम, जि प शाळेचे शिक्षक धडे, गायकवाड आणि रामकिसन मास्तर यांनी परिश्रम घेतले उत्सव दीपावलीचा, "सामाजिक बांधिलकीचा "हे उद्देश घेऊन आपणही समाजाचे देणे लागतो या भावनेने केलेल्या कार्याचे गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे.
0 Comments