निलंगा तालुक्यातील ताजपुर येथे हरभरा कापणी प्रयोग
निलंगा:{प्रतिनिधी/ इरफान शेख} तालुक्यातील ताजपुर शिवारात रब्बी हंगाम सन 2021-22 अंतर्गत पांडुरंग मोगरगे यांच्या शेतात दि. 22 फेब्रुवारी 2022 रोजी हरभरा पिक कापणी प्रयोग लातूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय च्या सांख्यिकी अधिकारी श्रीमती आर. व्ही. शिंदे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. या वेळी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या सांख्यिकी विभागातील कृषी पर्यवेक्षक सी.जे. सलगरे, निलंगा तालुका कृषी कार्यालयातील मंडळ कृषी अधिकारी डी. पी. पांचाळ, विमा कंपनीचे प्रतिनिधी ए. व्ही. भताने, ताजपुर चे उपसरपंच बालाजी भुरे, ग्रामसेविका ए. जी. थोरमोटे, ताजपुर चे कृषी सहाय्यक एस.आय. लोहारे, शेतकरी शरद पाटील, पांडुरंग मोगरगे आदीसह शेतकरी उपस्थित होते.
0 Comments