चार मुलीवर मुलगा झाला तोही काळाने हिरावला
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील भादा येथील कृष्णा बळीराम(वाघा) विभूते वय 6 वर्ष याला विषारी दंशाने मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मंगळवार दि 19 एप्रिल 2022 रोजी रात्री घरासमोरील अंगणात सर्व बहिणी आणि आई यांच्या मध्यभागी झोपला असता 12:00 ते 1:00 च्या दरम्यान विषारी दंश झाल्याने छोटा कृष्णा झोपेतून उठला आणि त्याच्या आईला पाणी मागितले.आईने पाणी दिले असता तो हात दुखत आहे तो दाबण्यात सांगितला परंतु तो पर्यंत बेशुद्ध पडल्याने त्याला शेजाऱ्याच्या मदतीने प्राथमिक आरोग्य केंद्र भादा आणि तेथून औसा येथे घेऊन जाण्यात आले. परंतु तोपर्यंत त्याचा प्राण गेल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कृष्णाचा अंत्यविधी बुधवार दि. 20 एप्रिल 2022 रोजी सकाळी साडे नऊ वाजता भादा येथील लिंगायत स्मशानभूमीत करण्यात आला. हा सहा वर्षीय कृष्णा त्याच्या चार बहिणीच्या पाठीवर एकुलता एक मुलगा झाल्याने त्याचा लाड आई-वडील आजी-आजोबा,पणजी यांच्या कडून खूप केला जात होते. तो हुशार आणि बुद्धिमान होता. यामुळे त्याच्या अकाली जाण्याने भादा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

0 Comments