Latest News

6/recent/ticker-posts

सध्याच्या वाढत्या उन्हाची चाहूल,आधार प्रतिष्ठानचे माणुसकीचे पाऊल

सध्याच्या वाढत्या उन्हाची चाहूल,आधार प्रतिष्ठानचे माणुसकीचे पाऊल

बी डी उबाळे

औसा: औसा तालुक्यातील भादा येथे वाढते उन्हाची चाहूल पाहून तहानलेल्या मानवासाठी पाण्याची उपलब्धता करून आधार प्रतिष्ठान यांनी उचलले माणुसकीचे पाऊल असे दृश्य भादा येथील थंड पाणपोई पाहून नक्कीच पाणी पिणाऱ्या आणि तृप्त होणाऱ्या नागरिकांना वाटल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी शुद्ध थंड फिल्टर पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे आधार प्रतीष्ठान कडून सांगण्यात आले आहे. हा नियोजित कार्यक्रम भादा माजी सरपंच दिनकर माळी यांच्या हस्ते या पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आधारचा आणि सामाजिक सेवेचा कणा असणारे प्रतिष्ठानचे रविशंकर आर पाटील, प्रशांत पाटील, दीपक मानधने, लखन लटूरे, रियाज खोजे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments