Latest News

6/recent/ticker-posts

देवकन्या मदनलाल तोष्णीवाल यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक गुरूगौरव पुरस्कार

देवकन्या मदनलाल तोष्णीवाल यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक गुरूगौरव पुरस्कार


लातूर: महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ,जिल्हा लातूर यांच्या वतीने दि.25 एप्रिल रोजी जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक गुरूगौरव पुरस्कार 2021 चे आयोजन दयानंद महाविद्यालय सभागृहात करण्यात आले होते. देवकन्या मदनलाल तोष्णीवाल( भुतडा ) यांना खा. सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून त्या रघुनाथ कलंत्री प्राथमिक विद्यालय लातूर येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या अविरत प्रयत्नांतून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध सहशालेय उपक्रम राबवितात. तसेच शैक्षणिक व सामाजिक उपक्रमात पुढाकार घेतात. सदरिल कार्यक्रमास अध्यक्ष किरणराव भावटनकर(राज्य कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद) प्रमुख अतिथि खासदार सुधाकर श्रृंगारे, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, प्रेरणा होनराव(भाजपा प्रदेश सचिव) मधुकरराव उन्हाळे, संजय कोठाळे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सुराणा सचिव रामदास पवार तसेच सर्व सहशिक्षकांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments