Latest News

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय "महात्मा फुले समाजरत्न पुरस्काराने" माझं लातूर सन्मानित.

राज्यस्तरीय "महात्मा फुले समाजरत्न पुरस्काराने" माझं लातूर सन्मानित.

माझं लातूर परिवाराच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा


के वाय पटवेकर

लातूर: जिल्ह्यातील सामाजिक चळवळीला नवी दिशा देणाऱ्या माझं लातूर परिवाराच्या समाजपयोगी उपक्रमांची दखल घेत महात्मा फुले ब्रिगेड आणि श्री संत शिरोमणी सावता माळी सेवाभावी संस्थेच्या वतीने काल लातूरात राज्यस्तरीय "महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार" देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. याप्रसंगी मा.खासदार, मा.कुलगुरू, मा.नगराध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय प्रा डॉ जनार्धन वाघमारे, ज्येष्ठ समाजवादी नेते आदरणीय ऍड मनोहरराव गोमारे, मा. खासदार डॉ सुनिलजी गायकवाड, आमदार अभिमन्यूजी पवार, दत्ता माळी यांची उपस्थिती होते. हा राज्यस्तरीय पुरस्कार परिवारातील प्रत्येक क्रियाशील मान्यवरांना समर्पित ज्यांची मोलाची साथ, मार्गदर्शन, सहभाग, निस्वार्थ सेवाभाव वेळोवेळी आम्हाला प्रेरित करीत आहे. यापुढील काळातही ही चळवळ नव्या जोमाने अविरत सुरू राहील ही ग्वाही यानिमित्ताने देत आहोत. आता जबाबदारी वाढत आहे तसेच लातूरकरांचा आमच्याप्रती विश्वास आणि प्रेमही वृद्धिंगत होत आहे. अशी प्रतिक्रिया माझं लातूर परिवार समूहाचे प्रमुख सतीश तांदळे यांनी मराठी अस्मितेचा इशाराच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

Post a Comment

0 Comments