Latest News

6/recent/ticker-posts

श्रीशैल्य माशाळकरांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड

श्रीशैल्य माशाळकरांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड


बी डी उबाळे

औसा: महाराष्ट्र शिक्षक पॅनल आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक/शिक्षिका सेवासन्मान पुरस्कार 2022 साठी लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात अजीम मा.व उच्च मा.विद्यालय येथील उपक्रमशील शिक्षक श्रीशैल्य माशाळकर यांच्या शैक्षणिक, सामाजिक,सांस्कृतिक, क्षेञातील उत्कृष्ट कार्याबद्दल व शाळेतील विविध उपक्रमांची दखल घेऊन महाराष्ट्र शिक्षक पॅनल निवड समितीच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा दि.15 मे 2022 रोजी सिनेसृष्टीतील कलावंत व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थीतीत अंकुशराव लांडगे सभागृह पुणे येधे वितरीत करण्यात येणार आहे. सदरील पुरस्कार निवड महाराष्ट्र शिक्षक पॅनल लातूर जिल्हातील निवड समिती सदस्य चंद्रकांत गोरगिळे,दिपक चामे,सुरेश सुडे,विकी येलमटे,उबेद शेख,श्रीकांत देशपांडे,अशोक पांडे,ज्ञानेश्वर बडगे,रंगनाथ सगर, दयानंद बिराजदार, जयराज सोदले, हेमंत कव्वेकर, शांता लोहारे,बाळासाहेब कांबळे,सुनीता भंडे,संगीता स्वामी,विजय पोतदार,रवी देशमुख यांच्या वतीने करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल श्रीशैल्य माशाळकर यांचे सर्वच शैक्षणिक क्षेञातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments